पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाणात तोटा असला तरी सरकारने एकूण तोट्याला कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बाजारातून व इतर ठिकाणावरून कर्जे घेऊन चालू खर्च व प्राप्तित अंतर कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. १९७९ ते ८० च्या पूर्वीची परिस्थिती मात्र निश्चितच चांगली होती. तेव्हा सरकार हे उत्पन्न खर्चातील नियंत्रण देण्यास आयुष्य झाले होते. हे खाली दिलेल्या आकड्यांवरून लक्षात येईल.
 १९६९ ते ७० आणि १९७८ ते ७९ मध्ये खर्च व प्राप्तीचे टक्केवारी प्रमाण १०० च्या आत होते व १८८५-८६ मध्ये या प्रमाणाची १२० पर्यंत क्रमबद्ध वाढ झाली आहे

तक्ता क्रमांक-१
केंद्र सरकारचा बटवडा व प्राप्ती


प्राप्ती जमा-खर्चाचा हिशोब
भांडवल जमा खर्चाचा हिशोब
 
वर्ष खर्च प्राप्ती फायदा (+) तोटा (-) खर्च/ प्राप्तीचे %प्रमाण बटवडा प्राप्ती फायदा (+) तोटा (-) बटवडा व प्राप्तीचे %प्रमाण
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९)
१९६९-७० २९४२ ३०६७ + १२५ ९६ २६७९ २,५०८ -१७१ १०७
१९७०-७१ ३१७९ ३३४२ + १६३ ९५ २४९४ २,०४६ -४४८ १२२
१९७१-७२ ४१२८ ४०२८ -१०० १०२ ३४५० ३,०३१ -४१९ ११४
१९७२-७३ ४५९२ ४५७८ -१४ १०० ३८२९ २,९७४ -८५५ १२९
१९७३-७४ ४८३६ ५०७३ +२३७ ९५ ४२११ ३,६४६ -५६५ ११५
१९७४-७५ ५७१३ ६५५७ +७६४ ८८ ४७८२ ३२९७ -१४८५ १४५
१९७५-७६ ७१८८ ८०७५ +८८७ ८९ ५९५० ४६९७ -१२५३ १२७
१९७६-७७ ८४४१ ८७३९ +२९८ ९७ ६०३६ ५६०७ -४२९ १०८
१९७७-७८ ९३६२ ९७९२ +४३० ९६ ६९५१ ५५८८ -१३६३ १२४
१९७८-७९ १०९४८ ११२४० +२९२ ९७ ८७३६ ६९३८ -१७९८ १२६
१९७९-८० १२०३४ ११३४० -६९४ १०६ ७८६४ ६१२५ -१७३९ १२८
१९८०-८१ १४५४४ १२८२९ -१७१५ ११३ ९६३३ ८७७१ -८६२ ११०
१९८१-८२ १५८६८ १५५७४ -२९४ १०२ ११२५८ १०१५६ -१०९४ १११
१९८२-८३ १९३४५ १८०९१ -१२५४ १०७ १३६८७ १३२८६ -४०१ १०३
१९८३-८४ २२८९० २०४९३ -२३९७ ११२ १४८८१ १५८६१ +९८० ९४
१९८४-८५ २७८८१ २४३८४ -३४९७ ११४ १८०१९ १७७६८ -२५१ १०१
१९८५-८६ ३४९६१ २९०२१ -५९४० १२० २२१६१ २३६११ +१४५० ९४
१९८६-८७ ३८२७४ ३१४०० -६८७४ १२२ २१६७३ २४८९७ +३२२४ ८७
(संदर्भ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन-करन्सी व फायनान्स)

 तक्ता क्रमांक एकवरून असे सांगता येईल की केंद्र सरकार रुढीसंमत अथवा सांप्रदायिक खर्चाच्या वाढीला नियंत्रित करू शकत नाही किंवा प्राप्ती तेवढ्या वेगाने वाढवू शकत नाही. केंद्र सरकारने भांडवल बटवडाच्या माध्यमाने सापेक्षित खर्च कमी केला आहे. यावरून असे लक्षात येते की, बटवडा आणि प्राप्तीच्या टक्केवारीचे प्रमाण भांडवलाच्या अर्थसंकल्पात बरेच कमी

झालेले आहे. १९८४-८५ मध्ये ते १०१% होते व १९८५-८६ मध्ये ते ९४

अर्थाच्या अवती-भवती । १०३