पान:अयोध्येचे नबाब.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वा.] वजीरअल्ली व सादतअल्ली. आहे की, "त्याच्या एकंदर राज्यव्यवस्थेमुळे लोक फार सुखी व संतुष्ट झाले. राज्यांतील पड जमिनीची लागवड झाली आणि दाट चस्तीच्या प्रांतांतून जमीनमहसूल द्रव्यरूपाने घेण्याची पद्धति अमलांत आली. एकंदरीत, सादतअल्लीने आपल्या पश्चात् 'रयतेचा मित्र' अशी कीर्ति मिळवून राज्याचा खजिना पूर्णपणे भरून ठेविला." कर्नल स्लीमन ह्यांनी सादतअल्लीच्या शहाणपणाची फारच तारीफ केली आहे. ते लिहितात:-"सादतअल्ली चांगला कर्तृत्ववान् पुरुष होता. तो ब्रिटिश हिंदुस्थानांतील युरोपियन अधिकाऱ्यांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे राज्यकारभाराच्या कामांत चांगला निष्णात झाला होता. त्याला राज्यांतील लोकांचा स्वभाव, त्यांची समाजघटना आणि त्यांच्या गरजा ह्यांची पूर्ण माहिती झाली होती. तो मनुष्याच्या गुणांची पारख करण्यांत हातखंडा असून, योग्यस्था। योग्य माणूस नेमून त्यावर उत्तम प्रकारें देखरेख करण्याची हातोटी त्यास विशेष साधली होती. सादतअल्लीचे नौकर लोक त्यावर राजी असून, ते आपले काम इमाने इतबारे बजावीत असत. सादतअलीने त्यांस त्यांच्या गुणांप्रमाणे जहागिरी व इनामें देण्याचा क्रम ठेविला होता.” सादतअल्लीचा मुख्य दिवाण मनोवरउद्दौला हा असून हकीम मेहेंदी हा एक थोर पुरुष त्याच्या दरबारांत सल्लामसलत देत असे. त्याचा खाजगी दिवाण दयाशंकर म्हणून एक हिंदु गृहस्थ होता. त्याने इ० स० १८१० मध्ये जमिनीच्या पाहणीचे काम उत्कृष्ट रितीने करून जमिनीच्या उत्पन्नाप्रमाणे योग्य आकार बसविला. त्यामुळे नबाबाचा फार फायदा झाला. तात्पर्य, ज्या सादतअल्लीस लॉर्ड वेलस्ली ह्यांनी, इ० स० १८०१ मध्ये, 'राज्य करण्यास असमर्थ' असें ठरवून राज्यावरून दूर करण्याचा निश्चय केला होता, तोच सादतअल्ली इ० स० १८१४ मध्ये, राज्यकार