पान:अयोध्येचे नबाब.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. - [भाग वेलस्ली ह्यांस लखनौ येथे पाठविले. त्यांनी सादतअल्लीबरोबर नवीन तह करून त्याजकडून सैन्याच्या खर्चाकरितां फरुकाबाद, मैनापुरी, इटावा, कानपूर, फत्तेगड, अलहाबाद, अजीमगड, बास्ती, गोरखपर, वगरे मिळून १,३५,००,००० रुपये वसुलाचा प्रांत ईस्ट इंडिया कंपनीकडे सर्व हक्कांसह तोडून घेतला ; व इतःपर नबाबास सैन्याचा खर्च निराळा द्यावा लागणार नाही व बाकीचा प्रांत सादतअल्लीकडे वंशपरंपरा चालविला जाईल असें ठरविले. येणेप्रमाणे तीन वर्षेपर्यंत ज्या मतलबाकरितां सादतअल्लीस त्रास व मानहानि ही सोसावी लागली तो लॉर्ड वेलस्ली ह्यांचा मतलब सिद्धीस जाऊन, अयोध्येचे अर्धे राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या पदरांत पडले, आणि सादतअल्ली राजकीय वेदनांतून मुक्त झाला. ह्यानंतर इ० स० १८०१ पासून इ०स० १८१४ पर्यंत सुमारे बारा तेरा वर्षे, सादतअल्लीस अयोध्येच्या राज्यकारभाराकडे लक्ष्य पुरविण्यास शांतता प्राप्त होऊन, त्याने आपली कारकीर्द प्रजेस सुखावह होईल असा यत्न केला. त्याने चांगले चांगले मुत्सद्दी व शहाणे लोक आपल्या दरबारामध्ये ठेविले, व प्रथमतः सर्व प्रांताची पहाणी करून जमीनमहसुलाची सुरळीत व्यवस्था लाविली. नबाब व ब्रिटिश कंपनी ह्यांच्या वादांत जे जमीनदार प्रबल होऊन राजकीय खंडणी देईनातसे झाले होते, त्यांची खोड मोडून त्यांच्याकडून नियमाने वसूल येईल अशी तजवीज केली. त्याने 'इजायची पद्धति' बंद करून तिच्या ऐवजी 'अमानी' म्हणून एक नवीन पद्धति सुरू केली. त्याचप्रमाणे, न्यायपद्धतीत सुधारणा करून प्रजेस योग्य न्याय मिळेल असा बदोबस्त केला. तात्पर्य, सादतअल्लीच्या कारकीर्दीत अयोध्येच्या राज्याची चांगली व्यवस्था होऊन त्यास सस्थिति प्राप्त झाली. कर्नल म्याक् अंड्यु ह्यांनी सादतअल्लीच्या कारकीर्दीसंबंधाने असे लिहिले