पान:अयोध्येचे नबाब.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ अयोध्येचे नबाब. [ भाग ६ वा] w w wvwwwvouuu uuuuuuwwww भारांतील ब्रिटिश सरकाराची किंवा रेसिडेंटाची भानगड बंद झाल्यामुळे 'उत्तम राज्यकर्त्ता' ठरला, ह्यावरून शहाण्या व कर्तत्ववान् संस्थानिकास स्वतंत्र रीतीने राज्यकारभार चालविण्याची संधि मिळाली असता त्याचे खरे गुण प्रदर्शित होऊन, प्रजेस सुख होते व संस्थानचे कल्याण होते, असें म्हणण्यास हरकत नाही. सादतअल्ली ह्याने आपल्या कारकीर्दीत दिलाराम, दिलखुष, मुसाबाग, हय्यतबक्ष, नूरबक्ष कोठी, खासबाजार, हजरत आबासचा दर्गा वगैरे अनेक इमारती बांधल्या. तथापि त्याचा खर्च माफक असल्यामुळे त्यास आपल्या खजिन्यांत पुष्कळ पैसा शिल्लक ठेवितां आला. त्याच्या मृत्युसमयीं अयोध्येच्या खजिन्यांत १४ कोट रुपये शिल्लक होते. ह्यावरून त्याच्या राज्यकारभाराच्या व्यवस्थितपणाची कल्पना करितां येईल. सादतअल्ली ता० ११ जुलई इ० स० १८१४ रोजी मृत्यु पावला, त्याची पत्नी मुर्शीदज्यादी ही त्याच्या मागून काही कालाने मृत्यु पावली. ह्या उभयतांची कबरस्थाने लखनौ येथें सांप्रत क्यानिंग कॉलेजजवळ आहेत. सादतअल्ली ह्यास शमसुद्दौला व गाझीउद्दीन हैदर असे दोन पुत्र होते. ह्यांपैकी पहिला पुत्र त्याच्या हयातीतच मृत्यु पावला होता, त्यामुळे त्याच्या पश्चात् गाझीउद्दीन हैदर हा लखनौच्या गादीचा मालक झाला.