पान:अयोध्येचे नबाब.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वा.] वजीरअल्ली व सादतअल्ली. रनर जनरल होते. ते इ० स० १७९८ मध्ये विलायतेस जाऊन त्यांच्या जागी लॉर्ड वेलस्ली हे आले. त्या समयास अहमदशहा अबदाल्लीचा मुलगा जमानशहा हा उत्तर हिंदुस्थानावर स्वारी करणार अशी एक बातमी पसरली होती. त्याकरितां सैन्याची तजवीज करण्याकडे लॉर्ड वेलस्ली ह्यांचे विशेष लक्ष्य लागले. त्यांनी प्रथमतः लखनौ हे उत्तरेकडील प्रांताचें एक नाकें समजून, तेथील बंदोबस्त करण्यास प्रारंभ केला; आणि एकदम इंग्रजी लष्कर तेर्थे पाठवून दिले. आणि सादतअल्लीस लखनौ येथील खाजगी सैन्य ८०,००० होतें तें कमी करून, त्या ऐवजी ब्रिटिश सैन्य ठेवण्याबद्दल व त्याचा खर्च संस्थानांतून देण्याबद्दल तगादा चालविला. सादतअल्लीने ता० २१ जानेवारी इ० स० १८०० रोजी लखनौचे रेसिडेंट कर्नल स्कॉट ह्यांच्या मार्फत गव्हरनर जनरल ह्यांस एक विस्तृत पत्र पाठवून, पूर्वीच्या तहाप्रमाणे अयोध्येवर ब्रिटिश सैन्य आणखी लादणे अन्यायाचे आहे वगैरे मजकूर फार लीनतेने व स्नेहभावाने लिहिला. परंतु तो लॉर्ड वेलस्ली ह्यांस अप्रिय वाटून त्यांनी आपला हेतु पूर्ण करण्याचा हट्ट धरिला, सादतअल्लीने ब्रिटिश सैन्याचा खर्च देण्यास आपणास सामर्थ्य नाही असे कळविलें. त्यावरून गव्हरनर जनरल ह्यांनीही त्यास राज्यकारभार करण्याचे 'सामर्थ्य नाही' असें ठरविले. शेवटी उभयतांचा बराच पत्रव्यवहार होऊन, अखेर ता० २२ जानेवारी इ० स० १८०१ रोजी, लॉर्ड वेलस्ली ह्यांनी सादतअल्लीने गादीवरून दूर व्हावे, किंवा नवीन तह करून आमचे म्हणणे कबूल करावे, असा अखेरचा खलिता पाठविला. सादतअल्लीने पुष्कळ आढेवेढे घेतले, परंतु सार्वभौम सत्तेपुढे त्याचा निरुपाय होऊन तीस हार जाणे त्यास भाग पडले. लॉर्ड वेलस्ली ह्यांनी ता० १० नोव्हेंबर इ० स० १८०१ रोजी आपले बंधु हेन्री