पान:अयोध्येचे नबाब.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० ___ अयोध्येचे नबाब. [ भाग - ह्या तहामुळे ईस्ट इंडिया कंपनीस सैन्याच्या खर्चाबद्दल सालीना २० लक्ष रुपयांची अधिक रक्कम मिळून अलाहाबाद व फत्तेगड हे दोन बळकट किल्ले व त्यांच्या दुरुस्तीकरितां ११ लक्ष रुपये आणि सादतअल्लीच्या राज्यारोहणाकरितां झालेला १२ लक्ष रुपये खर्च मिळून एकंदर पुष्कळच फायदा झाला. सादतअल्ली ह्यास अयोध्येची गादी सुदैवाने प्राप्त झाली, परंतु त्याच्या आगमनाने प्रजेचेही दैव उघडले. सादतअल्ली हा मुजाउद्दौल्यासारख्या रंगेल नबाबाचा पुत्र होता, त्यामुळे त्यास बापाप्रमाणे थोड्याशा राजविलासाच्या संवई लागल्या होत्या. तथापि त्याच्या ठिकाणी राज्यकारभार चालविण्याचे सामर्थ्य उत्तम प्रकारे वसत असून अयोध्येची राज्यसूत्रे त्याच्या हाती येतांच त्याची राज्यकृर्तृत्वशक्ति व्यक्त होऊ लागली. अल्पकालामध्ये त्याने प्रजानुरंजन करून लोकप्रियता संपादन केली. सादतअल्ली गादीवर बसला त्या वेळी त्याचे वय चाळीस वर्षांचे होते. तो नेहमी प्रसन्नमुख होता. त्यास गादीवर येण्यापूर्वी शिकारीचा व मदिरेचा थोडा नाद होता, परंतु तो विचारशील व मितव्ययी असल्यामुळे तो त्या व्यसनांत गर्क झाला नाही. तो गादीवर बसल्यानंतर त्यास आपली जबाबदारी पूर्ण, समजू लागली, व त्याने सुखोपभोगास रजा देऊन आपले सर्व लक्ष्य राज्यकारभाराकडे लाविले. त्याने आपल्या धर्माप्रमाणे 'हजरत आबास 'च्या मशिदीमध्ये जाऊन संसारसुखाचा त्याग केला आणि राजकर्तृत्व अंतःकरणपूर्वक करीन अशी शपथ घेतली. ती त्याने अखेरपर्यंत पाळण्याचा यत्न केला. परंतु त्यास ब्रिटिश सरकाराकडून मध्यंतरी-विशेषतः त्याच्या कारकीर्दीच्या प्रारंभासबरेच अडथळे आले, त्यामुळे त्याचा पुष्कळ निरुत्साह झाला. सादतअल्ली गादीवर बसला त्या वेळी सर जॉन शोअर हे गव्ह