पान:अयोध्येचे नबाब.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वा.] वजीरअल्ली व सादतअल्ली. तो कमी व्हावा. ह्याकरितां कंपनी सरकारास विचारून ज्यांत नबाबाचें हित होईल त्याप्रमाणे बंदोबस्त करावा. १३ वे कलमः-कंपनी सरकारचे वनबाबाचे राजकारण एकच आहे; उभयतांत भेद नाही; म्हणून नबाबाचे व परक्या मुलखाचे राजकारण जाबसाल करावे लागले तरी नबाबांनी इंग्रजांस विचारल्यावांचून परक्या मुलखाशी राजकारण जाबसाल करूं नये. याप्रमाणे नबाबांनी कबूल केले. १४ वें कलमः-इंग्रजांचा व नबाबांचा सौदागिरीविषयीं तह झाला होता, परंतु त्याप्रमाणे आजपावेतों सौदागिरी नबाबाचे मुलकांत नीट चालली नाही. यास्तव उभयतांनी कबूल केले आहे की आजपासून सौदागिरी तहाप्रमाणे चालेल. १५ वे कलमः-नबाबांनी कबूल केले की, अठरा टोपीवाल्यांत कोणालाही आम्ही चाकरीस लावणार नाही, व कंपनीच्या मर्जीशिवाय आमचे मुलखांत राहू देणार नाही. १६ वे कलमः-नबाबांनी कबूल केले की, आमचे बंधूचे पुत्रास आमचे राज्यांत घेऊ व त्याचे संरक्षण करूं. १७वें कलमः-नबाब वजीरउलमुमालिक सादतअल्लीखान बहादूर यानी कबूल केले की आमचे वंशपरंपरा आम्ही हा तह बिघाड न होय असा चालवं. कंपनीचे स्थानी गव्हरनर जनरल बंगाला लाट सर जॉन शोअर यानी कबूल केले की, हा तह कलमी बिघाड न होय असा आम्ही चालवू. आणि उभयतांनी कबूल केले की, उभयतांचा दोस्ती संबंध व उभयतांच्या मुलखाचा संबंध व उभयतांच्या रयतेचा संबंध या तहापासून जो होईल तो कदापि मोडणार नाही. उभय सरकारचे राजकारण जाबसाल एकविचारे चालवू. नबाबाचा संबंध व अधिकार, आपले खानदान व जमीन व देणे घेणे व रयत व फौज यांवर राहील. इंग्रजांचा त्याशी संबंध राहणार नाही."