पान:अयोध्येचे नबाब.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग ८ वे कलम:-इंग्रजांस ठाण्यास अयोध्येत किल्ला नाही, याजकरितां नबाबांनी इंग्रजांचे दोस्तीचा विश्वास धरून त्यांस अलाहाबाद किल्ला सरंजामसुद्धां व घांट व मैदान जमीन भोवतालची सुद्धा इंग्रजांस दिला. इंग्रजांनी कबूल केले की घांटाचा पैका दरसाल वसूल करून नबाबास देत जाऊ. नबाबांनी कबूल केले की अलाहाबाद किल्ला नीट बांधावयाकरितां आठ लक्ष रुपयेपर्यंत इंग्रजांस देऊ. हे रुपये किल्ला बांधण्यास सुरुवात केली म्हणजे दोन वर्षात खर्चास देऊ. आणि नबाबांनी कबूल केले की, फत्तेगड किल्ला बांधावयास सुद्धां इंग्रज कंपनी यांस सहा महिन्यांत तीन कक्ष रुपये अगाऊ देऊ. ९ वे कलम:-कदाचित् नबाबांच्या मुलुखाचा आधिक बंदोबस्त व्हावा याजकरितां कानपुरांत व फत्तेगडांत इंग्रजांची फौज आहे ती तेथून काढावी लागली व त्यापेक्षा अधिक उपयोगी जाग्यांत ठेवावी लागली, तरी ते वेळेस नबाबांनी दुसरे जागी फौज येईल तिचा खर्च द्यावा. १० वें कलमः-नबाबास राज्याभिषेक करून मुलूख दिला त्याबद्दल इंग्रजांस बहुत श्रम झाले याजकरितां नबाबांनी कबूल केले की बारा लक्ष रुपये तुम्हांस देऊ. त्याप्रमाणे ते द्यावे. । ११ वें कलमः-दुसरे व तिसरे कळमाप्रमाणे नबाबांनी कबूल केलेके रुपये हप्तेबंदीप्रमाणे वेळेवर देत जावें. कदाचित् समयावर पैका पावला नाही व बाकी राहिली तर ये विसींची निशा जामीन द्यावा. पुढेही साकोसाल बाकी न राही त्याची निशा द्यावी. १२ वें कलमः-नबाबाचा व इंग्रजांचा तह झाल्यापासून फौजेचा खर्च अधिक वाढला आहे व कित्येक जास्ती खर्च जमेपेक्षा करावा लागतो; याजकरितां नबाबाच्या अनहिताकडे जो खर्च असेल