पान:अयोध्येचे नबाब.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वा.] वजीरअल्ली व सादतअल्ली. www.amanarr arma .३ रे कलमः-सन १७९८ माहे जानेवारी ता० २१ रोजी नबाब सादतअल्लीखान बहादूर यास राज्याभिषेक झाला, त्या दिवसापासून अखेरसालपावेतों, साल दरसाल शहात्तर लक्ष रुपये देत जावें. नबाबांनी कबूल केले की, दरमहाचे दरमहा हप्तेबंदीप्रमाणे शहात्तर लक्ष तेहतीस हजार तीनशे एकूणचाळीस रुपये पांच आणे चार पैसे दरमहाचे दरमहा आम्ही इंग्रजांस देत जाऊ. यांत चुकणार नाही. ४ थे कलम:--पूर्वीचे कित्येक रुपये बाकी राहिले आहेत, ते राज्याभिषेक झाला त्या दिवसापयेत हिशेब करून, नबाबांनी कबल केले की रुपये देऊ. ५ वे कलमः-नबाबांनी कबूल केले की वजीर अल्लीखान यास दरसाल एक लक्ष पन्नास हजार रुपये देऊ व दरमहा त्याबद्दल बारा हजार पांचशे रुपये इंग्रजांकडे देत जाऊ. वजीर अल्लीखान इंग्रजांचे मुलुखांत राहील तोपर्यंत त्यास ते देत जातील. ६ वें कलमः-खानदानी लोक, बेगम साहेब व सखेसोयरे बनारसेमध्ये आहेत, त्यांचे खर्चाकरितां रुपये दोन लक्ष चार हजार दरसाल व फरकाबादेत कित्येक लोकांस खर्चाकरितां तेवीस हजार सहाशे अडतीस रुपये, एकूण परभारा इंग्रजांनी शहात्तर लक्षात देत जावें. ७ वे कलमः-इंग्रज कंपनी बहादूर यांचे स्थानी बंगाला लाट सर जॉन शोअर यांनी कबूल केले की, अयोध्येमध्ये आम्ही ठेवं ती फौज दहा हजार माणूस असामी कमी होऊ देणार नाही. इंग्रज फौज व हिंदु स्वार, पायदळ व तोफखानासुद्धा दहा हजार कमी होणार नाही. कदाचित् तेरा हजारावर जास्त फौज ठेवावी लागेल. ते वेळेस नबाबांनी कबूल केले की तो ज्यास्ती खर्च आम्ही देऊ. कदाचित इंग्रजांची फौज आठ हजारांत कमी झाली तर शहात्तर लक्षांत कमी फौजेचा ऐवज वजा करून द्यावा.