पान:अयोध्येचे नबाब.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. अयोध्येचे नबाब. [भाम 1 सादतअल्लीस गादीवर बसविल्यानंतर ता० २१ फेब्रुवारी इ० स० १७९८ रोजी इंग्रजांचा व त्याचा नवीन तह ठरला. तो येणेप्रमाणे:के "तह लखनौ नबाब सुजाउद्दौला बहादूर व असफउद्दौला बहादूर यांचा व इंग्रज कंपनी बहादूर यांचे कित्येक तह उभय सरकारचे प्रयोजनार्थ झाले होते; म्हणून नबाब वजीरउलमुमालीक व अमीनउद्दौला व निजामउलमुल्क सादतअल्लीखान बहादूर मुबारकजंग यांनी व बंगाला लाट सर जॉन शोअर ब्यारोनेट कंपनी बहादूर यांचे विद्यमाने, पूर्वीपासून जी दोस्ती आहे ती दोस्ती पुढे सदा चालवावी व त्या दोस्तीचे फळ उभयतांनी अनुभवीत जावे, याजकरितां हा तह केला. १ लें कलमः-पूर्वी उभय सरकारची जी दोस्ती आहे ती पुढे -सदा चालवावी. नबाब सादतअल्लीखान बहादूर याचे दोस्त व दुस्मान इंग्रजांस सारखे, व इंग्रजांचे दोस्त व दुस्मान ते सादतअल्लीखान यास सारखे. आणि उभयतांनी कबूल केले की, पूर्वीचे जे -तह आहेत ते या तहास विरोध न येतील ते सर्व मंजूर असें या तहासून ठरले आहे. २ रे कलमः-ह्या तहापासून कंपनी सरकारांनी कबूल केले होते की, नबाबास कोणी शत्रू होईल त्याचे पारिपत्य करून नवावाचा मुलूख आबाद राखीत जाऊं. याजकरितां व इंग्रजांनी आपल्या -मुलखाचे संरक्षणाकरितां फौज व तोफा व पायदळ व स्वार वगैरे वाढविले आहत म्हणोन, पेशजी नबाब असफजहाउद्दौला बहादूर हे रुपये ५६,७७,६३८ दरसाल देत होते. ते हल्ली फौज वाढविली आहे याजकरितां हल्ली नबाबांनी रुपये १९,२२,३६२ वाढवून दिले. एकूण पेशजीचे व हल्लींचे रुपये शहात्तर लक्ष अयोध्याशिका भावाप्रमाणे दरसाल इंग्रजांस देत जावे.