पान:अयोध्येचे नबाब.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ वा.] वजीरअल्ली व सादतमल्ली. www करून सादतअल्लीस गादीवर बसविण्याचा निश्चय केला. सादतअल्ली हा असफउद्दौल्याचे कारकीर्दीत खोजा बसंत ह्याच्या दंग्यापासून काशीस जाऊन राहिला होता व त्यास दीड लक्ष रुपये पेनशन मिळत होते. त्यास काशीचे रेसिडेंट मि० चेरी ह्यांनी गादीवर बसविण्याचा विचार कळवून व त्याजबरोबर नवीन तहाचा ठराव करून लखनौ येथे आणिलें. तेथें सर जॉन शोअर ह्यांनी ता० २१ जानेवारी इ० स० १७९८ रोजी बिबियापूर राजवाड्यामध्ये मोठा दरबार भरवून सादतअल्ली ह्यास राज्याभिषेक केला; आणि वजीरअल्लीस गादीवरून दूर केले. नंतर त्यास चांगल्या बंदोबस्तानें काशी येथे पाठविले व तेथे त्यास सादतअल्लीचे पूर्वीचे पेनशन दीड लक्ष रुपये देऊन नजरकैदेत ठेविलें. ह्या राज्यक्रांतीमुळे लखनौ येथे बरीच धामधूम उडाली, तथापि सर जॉन शोअर ह्यांनी मोठ्या शहाणपणाने ती शांत केली. वजीरअल्लीस पदच्युत केल्यामुळे इंग्रजांविषयी त्याचे मन फार संतप्त झाले. व काही दिवसांनी त्याचा क्रोधाग्नि प्रज्वलित होऊन, त्याने इ० स० १७९९ मध्ये काशी येथे मोठे बंड केले. त्या बंडामध्ये काशीचे रेसिडेंट मि० चेरी हे मारले गेले, व वजीरअल्लीचा पराभव होऊन तो इंग्रजांच्या हाती सांपडला. त्यांनी त्यास कलकत्ता येथील 'फोर्ट उइल्यम' ह्या किल्यामध्ये सक्त कैदेत ठेविलें. तेथें तो बरेच दिवस होता.. नंतर पुढे त्यास वेलोर येथे टिपुसुलतानाच्या पुत्राकरितां बांधलेल्या राजकीय कारागृहामध्ये नेले. तेथे तो हतभागी राजपुत्र इ० स० १८१७ मध्ये मृत्यु पावला. ह्याच्या लग्नखर्चास असफउद्दौल्याने ३० लक्ष रुपये खर्च केले होते, परंतु तो मृत्यु पावल्यानंतर त्याच्या कफनास अवघा ७० रुपये खर्च लागला! ह्याचें नांव नशीबाची लीला!! असो.