पान:अयोध्येचे नबाब.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwwwwwww ५ वा. ] असफउद्दौला. असफउदौल्याच्या इच्छेविरुद्ध पुनः लष्करीखर्च व अप्रिय दिवाण नेमल्यामुळे त्याच्या मनास एक प्रकारें धक्का बसला व तो लवकरच आजारी पडला. ह्या दुखण्यांत त्याने औषधपाणी कांही घेतले नाही. शेवटी तो ता० २१ माहे सप्टेंबर इ० स० १७९७ रोजी मृत्यु पावला. असफउद्दौल्याच्या मागून त्याचा एकुलता एक मुलगा वजीरअल्ली हा अयोध्येच्या गादीवर बसला. असफउद्दौल्याची बायको बेगम शमसुन्निसा ही त्याच्या पश्चात् बरेच दिवस जीवंत होती. तिला ८७,१६३ रुपये तनखा मिळत असे. ती इ० स० १८१३ मध्ये मृत्यु पावली.