पान:अयोध्येचे नबाब.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ वा. Moron वजीरअल्ली व सादतअल्ली. (इ० स० १७९७-इ० स० १८१४ ). असफउद्दौला मृत्यु पावल्यानंतर अयोध्येच्या गादीबद्दल तंटा उत्पन्न झाला. असफउद्दौला ह्यास वजीरअल्ली म्हणून एक औरस पुत्र होता. तो गादीचा खरा वारस असल्यामुळे त्यास गादी मिळणे रास्त होते. त्याप्रमाणे हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल सर जॉन शोअर ह्यांनी त्यास गादीवर बसविण्याबद्दल परवानगी दिली. व त्याप्रमाणे त्यास राज्याभिषेकही झाला. परंतु असफउद्दौल्याचे कारकीर्दीत गव्हरनर जनरलच्या मेहेरबानीने अयोध्येच्या प्रधानपदावर आरूढ झालेला गृहस्थ तफझुल हुसेन ह्यास ती गोष्ट पसंत पडली नाही. तो सुजाउद्दौल्याचा दुसरा पुत्र सादतअल्ली ह्याचा पुष्कळ दिवस शिक्षक असल्यामुळे, त्याचा मनोदय आपल्या शिष्यास. अयोध्येचे राज्यपद देऊन आपण त्याच्या वतीने स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवावा असे फार होते. तेव्हां त्याने वजीरअल्लीवर नानाप्रकारचे असत्य आरोप आणून त्याजविषयीं गव्हरनर जनरलचे मन कलुषित केले. त्यामुळे गव्हरनर जनरल ह्यांस ह्या गोष्टीचा विचार करणे भाग पडून ते लखनौस येण्यास निघाले. त्यास तफझुल हुसेन हा सामोरा गेला; व त्याने वजीरअल्ली हा अस्सल पुत्र नसून, तो व्यसनी व उधळ्या आहे; आणि त्याचे मन इंग्रजांविषयीं अराजनिष्ठ आहे वगैरे गोष्टी सांगून, सादतअल्लीस गादीवर बसविण्याबद्दल त्यांची मनधरणी केली. त्याचा परिणाम गव्हरनर जनरलच्या मनावर चांगला होऊन, त्यांनी वजीरअल्लीस पदच्युत