पान:अयोध्येचे नबाब.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वा.] असफउद्दौला. ७१ राजवाडे बांधिले. ते सांप्रत लखनौ शहरास भूषणभूत झाले असून त्यांपैकी दौलतखाना, रुमाई दरवाजा, हसनबाग, बिबियापूर कोठी, चिनहुत कोठी, ऐषबाग, चारबाग, व इमामवाडा इत्यादि सुंदर राजमंदिरें व उद्यानभूमिका अद्यापि प्रेक्षक जनांस आनंद देत आहेत. ह्यांपैकी इमामवाडा व रुमाई दरवाजा ह्या दोन इमारती त्याने केवळ दरिद्री जनांच्या उदरपोषणाकरितां बांधिल्या. त्या संबंधाने अशी आख्यायिका सांगतात की, इ० स० १७८४८५ ह्या वर्षी अयोध्येमध्ये जो दुष्काळ पडला, त्या वेळी असफउद्दौल्याचा वजीर रेजा हसनखान व दिवाण महाराज टिकायतराय ह्यांनी, दुष्काळपीडित मध्यम स्थितीतल्या लोकांच्या सोयीसाठी, हुजूर परवानगीनें रात्री मशाली लावून, ही कामें त्यांच्याकडून करवून घेतली. नबाब असफउद्दौला ह्यानें ईस्ट इंडिया कंपनीचा प्रचंड लष्करी खर्च भागवून आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस लखनौचे वैभव वाढविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता. त्याची महत्त्वाकांक्षा हैदराबादचा निजाम व म्हैसूरचा टिपु मुलतान ह्यांच्या राज्यवैभवापेक्षा आपले वैभव अधिक वाढवावे अशी फार होती. त्याने आपल्या राजधानीत हत्ती व जवाहीर फार विकत घेतले होते, आणि त्याचे प्रदर्शन करण्याकडे त्याची प्रवृत्ति जास्त असे. फोर्ब्रस साहेबानी त्याच्या वैभवसंपन्नतेची व डामडौलाची एक चमत्कारिक गोष्ट लिहिली आहे. ती येणेप्रमाणे:-"नबाब असफउद्दौला ह्याने आपला मुलगा वजीरअल्ली ह्याचे लग्न फारच थाटाने केले. त्याचे लग्नांत नुसते १२०० शृंगारलेले हत्ती वरातीपुढे चालत होते. नवऱ्या मुलाच्या अंगावर २० लक्षांचें जवाहीर होते. व त्याच्या चौपट किंमतीचे जवाहीर खुद्द नबाबाच्या अंगावर होते. ह्या लग्नसमारंभाचे वेळी लखनौच्या प्रख्यात इमारती तयार नव्हत्या म्हणून मुद्दाम दोन तंबू