पान:अयोध्येचे नबाब.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग ध्याचा यत्न केला व त्यांत त्यास अंशतः यश आले असें म्हणण्यास हरकत नाही. नबाब असफउद्दौला हा स्वतः फार चैनी, विषयासक्त, आणि दानशूर असल्यामुळे त्याचा खाजगी खर्च फारच अवाढव्य होता. त्याच्या दानशूरत्वाची कीर्ति फार विलक्षण असे. लखनौ प्रांतांतील लोक असे सांगतात की, "त्याची स्वारी शहरांत कधी कधी फिरावयास निघत असे. तेव्हां एखादे वेळेस, रस्त्यांत कोणी सुस्वरूप व सुलक्षणी असा भिकारी आढळून त्याचे मर्जीस आला. म्हणजे तो त्यास आपले बरोबर राजवाड्यांत नेऊन, प्रथम त्याजकडून उंची पोषाग करवून, नंतर त्यास एक सुस्वरूप स्त्री करून देई आणि त्यास पुष्कळ दौलत देऊन निरंतरचे उपजीविकेस कांहीं उत्पन्नही करून देई; आणि लोकांनी त्यास बहुमान द्यावा म्हणून त्यास आपले खासे मंडळीत दाखल करून 'नबाब' असा किताब देई. यावरून लोकांमध्ये: "जिसको न दे मौला, तिसको दे असफउद्दौला" अशी म्हण पडली आहे.* हिचा अर्थ असा की, "ज्यास मौला म्हणजे ईश्वर देत नाही, त्यास असफउद्दौला देतो." ह्यावरून त्याच्या दानशूरत्वाची कल्पना करितां येईल. नबाब असफउद्दौला जरी असा खर्चिक व डामडौली होता तरी त्याचे लक्ष्य सार्वजनिक व लोकोपयोगी कामाकडे विशेष होतें, ह्यानें लखनौ येथे अनेक पेठा वसवून मोठमोठे प्रेक्षणीय व भव्य

  • विंचुरकर यांच्या "तीर्थयात्राप्रबंध” ह्या पुस्तकांत हे वर्णन सुजाउद्दौल्यास लाविलें आहे, परंतु ती चूक आहे. हे वर्णन असफउद्दौल्याच्या दानशूरत्वाचे आहे.