पान:अयोध्येचे नबाब.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग जनरल होऊन आले. नबाब असफउद्दौला ह्याने पुनः त्यांस आपल्या संस्थानाची दुःस्थिति सादर केली. त्यानें, “इ० स० SATTA १७७४ पासून इ० स० १७८३ पर्यंत सुमारे ९ वर्षांत दोन कोटी तीस लक्ष रुपये कंपनीच्या लष्करी खर्चाबद्दल दिले. मूळ इ० स० १७७५ चा ठराव वार्षिक ३१,२०,००० रुपयांचा होता, तो बदलून इ० स० १७८१ मध्ये ३४,२०,००० रुपये देण्याचे मान्य केले; परंतु युरोपियन लोकांचा निरनिराळा खर्च मिळून ८४,००,००० रुपये कंपनीस द्यावे लागतात. ते देण्याची अयोध्या संस्थानची आतां ताकद राहिली नाहीं;" वगैरे सर्व गोष्टी लॉर्ड कॉर्नवालिस ह्यांस निरनिराळ्या प्रकाराने सांगितल्या. तेव्हां त्यांस नबाबाची दया येऊन त्यांनी ता०.१५ एप्रिल इ० स० १७८७ मध्ये नवीन तह केला व त्यांत सैन्य कमी करण्याचे जरी मान्य केले नाही, तरी सर्व लष्करी खर्च ५० लक्ष रुपयांवर मुक्रर केला, आणि ब्रिटिश रेसि. डेंटानें संस्थानच्या अंतर्गत राज्यकारभारांत बिलकूल हात घालू नये असे ठरविले. ह्या तहाने नबाब असफउद्दौला ह्यास अल्पसा तरी सैन्याचा खर्च कमी झाला असे वाटून, त्याने गव्हरनर जनरलच्या म्हणण्याप्रमाणे ५० लक्ष रुपये देण्याचे मान्य केलें ; व मागील बाकीपैकी काही रक्कम कंपनीच्या पदरांत घातली. . ह्यानंतर एक वर्षानें-म्हणजे ता०. २५ जुलई इ० स० १७८८ मध्ये, पुनः व्यापारसंबंधी आणखी एक तहनामा झाला. त्या वेळी जकातीसंबंधाने उभय पक्षांस फायदेशीर अशी काही कलमें ठरली. ह्याच समयीं लखनौ येथे गव्हरनर जनरलचा एजंट म्हणून जो अधिकारी सालीना १० लक्ष रुपये नेमणुकीवर होता त्याची जागा कमी केली; आणि कंपनीच्या नावाखाली कित्येक युरोपियन व्यापाऱ्यांना अयोध्येमध्ये जे हक्क प्राप्त झाले होते ते सर्व काढून घेतले. तात्पर्य, लॉर्ड