पान:अयोध्येचे नबाब.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वा.] असफउद्दौला. दुर्व्यवस्था होऊन सर्वत्र हाहाःकार उडाला. मि. ब्रिस्टो ह्याने इ. स. १७८२ साली अयोध्येच्या स्थितीचे जे वर्णन केले आहे त्यांत असे लिहिले आहे की, “प्रांतोप्रांतीचे आमिल ऊर्फ फौजदार स्वेच्छाचारी होऊन आपापल्या ठिकाणी स्वतंत्र राजेच बनले आहेत. त्यांची सत्ता अमर्यादित झाली असून, मन मानेल तो कायदा ते चालवीत आहेत. लखनौच्या दरबारचा त्यांवर बिलकूल धाक राहिला नसून सर्वत्र अव्यवस्था झाली आहे; आणि राज्यांत सुरक्षितपणा मुळीच राहिला नाही." ह्याच संबंधानें क्याप्टन एड्वर्ड्स ह्याने असें म्हटले आहे, "इ० स० १७७४ साली सुजाउद्दौल्याचे कारकीर्दीत अयोध्याप्रांत अतिशय भरभराटीमध्ये होता. परंतु इ० स० १७८३ मध्ये तो उध्वस्त व उच्छिन्न बनला." अशी स्थिति, केवळ ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा अवाढव्य खर्च, रेसिडेंट व इतर युरोपियन अधिकारी ह्यांची द्रव्यापहारबुद्धि, आणि संस्थानच्या राज्यकारभाराची ढवळाढवळ ह्यांमुळे प्राप्त झाली. ___ अयोध्या संस्थानची अगदी हीनदशा झाली व आतां निभाव लागत नाही असे पाहून, नबाब असफउद्दौला ह्याने गव्हरनर जनरल ह्यांस अयोध्यवर लादलेला लष्करीखर्च कमी करण्याबद्दल विनंति केली. तेव्हां इ० स० १७८४ मध्ये, वॉरन हेस्टिग्ज हे स्वतः लखनौस आले व त्यांनी तेथील सैन्याची एक तुकडी कमी केली, व जप्त केलेल्या जहागिरीचा काही भाग खुला केला. परंतु एवढ्याने अयोध्येची स्थिति सुधारण्यासारखी नसल्यामुळे, नबाब असफउद्दौला ह्याने आपल्या तक्रारी गव्हरनर जनरलकडे पाठविण्याचा क्रम एकसारखा सुरू ठेविला होता. इतक्यांत इ० स० १७८५ मध्ये गव्हरनर जनरल वॉरन हेस्टिंग्ज हे आपली चिरस्मरणीय कारकीर्द संपवून विलायतेस गेले व त्यांच्या जागी लवकरच लॉर्ड कॉर्नवालिस हे गव्हरनर