पान:अयोध्येचे नबाब.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग वॉरन हेस्टिंग्जच्या कीर्तीस अखंड कलंकदायक आहेत असे अनेक युरोपियन इतिहासकारांनीही प्रांजलपणे कबूक आहे.* असो. अयोध्येच्या बेगमांचे द्रव्यहरण झाल्यानंतर अयोध्येच्या राज्याची सर्व व्यवस्था वॉरन हेस्टिंग्ज ह्यांचा हस्तक हैदरबेगखान याजकडे होती. त्याने गव्हरनर जनरलच्या तंत्राने चालून प्रजेपासून अतिशय जुलमाने पैसा काढिला. वॉरन हेस्टिंग्ज ह्यांच्या मर्जीतले रेसिडेंट मिडलटन व पामर ह्यांनाही त्याचा तिरस्कार वाढू लागला. तेव्हां त्यांच्यावर गव्हरनर जनरलची गैरमर्जी होऊन त्यानी पुनः ब्रिस्टो ह्यास रेसिडेंट नेमिलें. ह्या वेळी त्यास, दिवाण हैदरबेगखान ह्याच्या अनुमताने चालण्याबद्दल गव्हरनर जनरलचा हुकूम झाला होता. पुनः एक वर्षानंतर ब्रिस्टोचे व गव्हरनर जनरलचे पटेनासे होऊन ब्रिस्टोस लखनौच्या रोसिडेन्सीचा राजीनामा देणे भाग पडले. अशा रीतीने वॉरन हेस्टिंग्ज ह्यांच्या कारकीर्दीत अयोध्येच्या राज्यकारभाराची

  • अयोध्येच्या बेगमापासून द्रव्य हरण करण्यासाठी वारन हेस्टिंग्ज ह्यांनी त्यांबर जे सक्तीचे व जुलमाचे उपाय योजिले त्यांचे वर्णन, आंग्लवक्ते बर्क क शेरिडन यांनी वॉरन हेस्टिंग्ज ह्यांच्या चौकशीच्या वेळी फारच बहारीचे केले आहे. त्यामध्ये लखनौचे रेसिडेंट मि० मिहल्टन ह्यांनी द्रव्य प्राप्तीस्तव त्या पडदानशीन राजस्त्रियांचे व त्यांच्या नौकरांचे कसे हाल केले त्याचा करुणरसपूरित वृत्तांत दिला आहे. ह्या संबंधाने मि० मिल यांनीही आपल्या इतिहासांत विस्तृत माहिती दिली आहे. मि. रॉबर्ट मांटगामरी ह्यांनीही बेगमांच्या वृद्ध व प्रामाणिक नौकरांच्या छलासंबंधाची हकीकत फारच हृदयद्रावक दिली आहे. ब्रिटिश सरकारचे स्तुतिपाठ गाणारे मेकाले सारखे मुत्सद्दीही या संबंधानें वॉरन हेस्टिंग्जवर दोषारोप करण्यास कमी करीत नाहीत. तेव्हां अशा ब्रिटिश राष्ट्राच्या शुभ्र कीर्तीस कलंकास्पद गोष्टीची विस्तृत हकीकत निराळी देण्याचे आम्हांस प्रयोजन दिसत नाही. ज्यास ती वाचण्याची इच्छा असेल त्यांनी वरील इंग्रजी ग्रंथ अवलोकन करावेत.