पान:अयोध्येचे नबाब.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग व्यापार सुरू केला, आणि जकातीचा वसूलही आपणच करूं लागले, त्यामुळे अयोध्येचा वसूल अगदी कमी झाला. ही सर्व माहिती मि० आयहिन व सर हेनरी लॉरेन्स ह्या लेखकांनी दिली आहे. तेव्हां ती असत्य किंवा अविश्वसनीय मानणेही जरा कठीण आहे, असो, नबाब असफउद्दौला ह्याने राज्याची अशी स्थिति झालेली पाहून इ० स० १७७८ मध्ये इंग्रज सैन्य व राज्यांतील इंग्रज कामदार कमी करण्याबद्दल गव्हरनर जनरल ह्यांस अर्ज केला. परंतु त्याच्या विनंतीचा उपयोग इ० स० १७८१ पर्यंत कांहींच झाला नाही, नंतर इ० स० १७८१ साली वॉरन हेस्टिंग्ज ह्यांनी चुनार येथे असफउद्दौल्याची भेट घेतली, आणि ता० १९ सप्टेंबर रोजी असें ठरविले की, अयोध्येच्या इंग्रज सैन्यापैकी फक्त एक कंपू व एक जादा पलटण ठेवून बाकीचे सर्व इंग्रज सैन्य नबाबाच्या राज्यांतून दुसरीकडे न्यावें; आणि ज्या अर्थी लष्करी अधिकाऱ्यांच्या प्राबल्यामुळे व जहागीरदारांच्या विस्तृत जहागिरीमुळे नबाबाच्या राज्यांत फार आपदा उत्पन्न झाली आहे, त्या अर्थी त्या जहागिरी जप्त कराव्या, व त्यांपैकी कंपनीने ज्यांची हमी घेतली आहे त्यांचा वसूल रेसिडेंटाचे मार्फत पोहोंचता करावा. ___ हा तह झाला त्या वेळी कंपनीच्या खजिन्याची स्थिति अत्यंत वाईट होती. ती सुधारण्याकरितां वॉरन हेस्टिंग्ज ह्यांनी नबाबास पूर्वीचे करारनामें रद्द करून वाटेल त्या त-हेनें ५५ लक्ष रुपये रोख व २० लक्ष रुपयांची रक्कम काही दिवसांनी, देण्याबद्दल मागणे केले. वॉरन हेस्टिग्ज ह्यांनी काशीच्या चेतसिंग राजाशी अतिशय जुलमाचे वर्तन केल्यामुळे काशी येथें इ० स० १७८१ च्या आगस्ट महिन्यांत बंड झाले. त्या बंडामध्ये अयोध्येच्या बेगमांचे अंग आहे असा खोटा