पान:अयोध्येचे नबाब.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वा.] असफउद्दौला. नौकर लोकांस पगार देण्यास किंवा नातेवाईक लोकांस तैनाती देण्यासही पैसा मिळेनासा झाला. राजवाड्यांतील स्त्रियांना उपासमार होऊ लागली. अशी स्थिति खुद्द नबाबाची झाली असतांना अयोध्येमध्ये वसुलाच्या कामावर नेमले युरोपियन लोक प्रांताचा वसूल नबाबाच्या खजिन्यांत न पाठवितां स्वतःच्या खिशांत भरून आपलाच तळीराम गार करूं लागले. मार्शमनच्या इतिहासांत कर्नल हेने नामक एका गृहस्थाचे उदाहरण फारच चमत्कारिक दिले आहे. इ० स० १७७८ मध्ये ह्या इसमास बाहरैच, गोंडा व गोरखपूर ह्या प्रांतांच्या जमाबंदीच्या कामावर नेमिलें होतें. तो इ० स० १७७८ पासून इ० स० १७८१ पर्यंत तीनचार वर्षाच्या अवधीत ३० लक्ष रुपये खिशांत घालून चालता झाला. तो पुनः १७८१ मध्ये अयोध्येस येणार असें ऐकून नबाब असफउद्दौला अगदी घाब - रून गेला व त्याने वॉरन हेस्टिंग्ज ह्यांस त्यास पुनः न नेमण्याबद्दल विनांत केली; एवढेच नव्हे तर तो पुनः जर आला तर आपण राज्यांत न राहतां गव्हरनर जनरलजवळ जाऊन राहूं असें कळविले.* तात्पर्य, स्वेच्छाचारी युरोपियन लोकांचा अयोध्येमध्ये सुळसुळाट झाल्यामुळे त्यांनी जमीनदार लोकांकडून वाटेल तसा पैसा घेतला,

  • मि. आयहिन यांनी नबावाच्या पत्राचा उतारा आपल्या पुस्तकांत दिला आहे तो वाचण्यासारखा आहे:

"Colonel Hannay is inclined to request your permission to be employed in the affairs of this quarter. If, by any means, any matter of this country dependent on me should be entrusted to the Colonel, I swear by the holy Prophet that I will not remain here, but will go from hence to you. From your kindness, let no concern dependent on me be entrusted to the Colonel." ; -Garden of India, page 90.