पान:अयोध्येचे नबाब.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नवाब. [भाग लोक होते. तिला ब्रिटिश रेसिडेंटाचे अभय मिळाल्यामुळे आतां कोणाचेही भय राहिले नाही. - ह्यानंतर सहा वर्षेपर्यंत लखनौचा राज्यकारभार असफउद्दौल्याने सुरळीत रीतीने चालविण्याचा यत्न केला; परंतु इकडे नबाबाच्या लष्करामध्ये युरोपियन अधिकाऱ्यांचा फार भरणा करून व मन मानेल त्याप्रमाणे नबाबाच्या सैन्यांत ढवळाढवळ करून इंग्रज रेसिडेंटाने अयोध्येत एकसारखा गोंधळ उडवून दिल्यामुळे तेथे कोणत्याही त-हेची शिस्त राहिली नाही. एतद्देशीय सैन्य बेदिल होऊन त्याने बंड केले. असफउद्दौल्याने आपल्या हातून कारभार निभण्याची आशा नाहीं असें पाहून, तो आपला दिवाण मर्तिजाखान ह्याच्या ताब्यात दिला. त्यामुळे बेदिल सैन्याचा अधिपति खोजा बसंत ह्याने असफउद्दौल्याचा धाकटा भाऊ सादतअल्ली ह्यास गादीवर बसविण्याचा विचार करून मूर्तिजाखान ह्यास ठार मारिलें. त्यामुळे अयोध्येत बरीच गडबड उडून ती बंद करण्यास असफउद्दौल्यास पुष्कळ त्रास पडला, शेवटी हेस्टिंग्जच्या मर्जीतला माणूस हैदरबेगखान ह्यास असफउद्दौल्याने अयोध्येचा दिवाण नेमून राज्यामध्ये कशी तरी शांतता केली. - ह्या सगळ्या भानगडींत सैन्याचा खर्च व कंपनीची बाकी अतिशय तुंबत चालली. सुजाउद्दौल्याचे कारकीर्दीत सैन्याचा खर्च २१॥ लक्ष रुपये कंपनीस द्यावा लागत असे, तो वॉरन हेस्टिंग्जच्या विरुद्ध कौन्सिलने ३१३ लक्ष केला. त्यामध्ये पुनः “टेंपररी ब्रिगेड" व इतर नवीन अधिकाऱ्यांचे पगार वैगेरे बाबी वाढत वाढत जाऊन एकंदर रक्कम फारच फुगत चालली. इ० स० १७७५ पासून इ० स० १७८१ पर्यंत सहा सात वर्षांत कंपनीस फक्त ७० लक्ष रुपये पोहोंच होऊन दोन कोटी दहा लक्ष रुपये बाकी नबाबाकडे थकली. त्यामुळे त्याची फारच त्रेधा उडाली. त्यास स्वतःच्या