पान:अयोध्येचे नबाब.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वा.] असफउद्दौला. wwwww कीर्दीत २,१०,००० ठरला होता, तो आतां २,६०,००० करावा; सुजाउद्दौल्याच्या कारकीर्दीत कंपनीच्या करारांपैकी जी बाकी देणे राहिली असेल ती सर्व नबाबाने द्यावी; आणि कंपनीने नबाबाच्या प्रांताचे संरक्षण करावें; ह्याप्रमाणे कलमें असून ती ता० २१ मे इ० स० १७७५ रोजी असफउद्दौला ह्याने मान्य केली. ह्यानंतर कंपनीचे अयोध्येस " परमनंट ब्रिगेड" म्हणून जे इंग्रज सैन्य होते त्याशिवाय "टेंपररी ब्रिगेड " म्हणून जादा सैन्य आणखी ठेविलें, व त्याचा सर्व खर्च नबाबावर लादला. मि० ब्रिस्टो हा वॉरन हेस्टिंग्जच्या विरुद्ध पक्षाचा होता. त्याने असफउद्दौला ज्या अर्थी लखनौच्या गादीचा मालक झाला त्याअर्थी संस्थानची सर्व संपत्ति त्याच्या स्वाधीन करणे अवश्य होते. परंतु तसे न करितां, त्याची आई भाऊ बेगम हिच्याताब्यांत सर्व संपत्ति दिली व तिला एक मोठी स्वतंत्र जहागीर तोडून दिली. त्यामुळे अर्थात् त्या उभयतांचें वांकडे येऊन, असफउद्दौल्यास आईजवळून द्रव्य घेणे भाग पडले. त्याप्रमाणे त्याने ६२ लक्ष रुपये घेतले. तेव्हां त्याच्या आईनें रेसिडेंटाकडे तक्रार केली. त्या वेळी रेसिडेंट मि० ब्रिस्टो ह्यांनी ता० १५ आक्टोबर इ० स० १७७९ रोजी असफउद्दौल्याकडून आईस त्रास देणार नाही असा कौलनामा लिहून घेऊन उभयतांचा वाद मिटविला. असफउद्दौल्याची आई भाऊ बेगम ही फैजाबाद येथे राहत असे व तेथेच अयोध्येचे नबाबही राहत असत; परंतु ह्या वादापासून असफउद्दौल्याने आपले राहण्याचे ठिकाण लखनौ येथे बदलले व तेथेच आपली राजधानी केली. भाऊ बेगम ही फैजाबाद व अयोध्या ह्या दोन स्थळी राहून आपला जहागिरीचा स्वतंत्र रीतीने बंदोबस्त करीत असे व तेथे ती आपल्या टंकसाळा चालवून नाणे पाडीत असे. तिच्या आश्रयास दोन हजार