पान:अयोध्येचे नबाब.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwmamiwana अयोध्येचे नबाब. [भाग मुळे त्यांनी ज्या कृति आचरण केल्या या अत्यंत गर्हणीय व तिरस्करणीय अशाच होत्या. संस्कृत सुभाषितामध्ये लोभाचा परिणाम वर्णन केला आहे: लोभः प्रतिष्ठा पापस्य प्रसूतिर्लोभ एव च । द्वेषक्रोधादिजनको लोभः पापस्य कारणम् ॥१॥ लोभात्क्रोधः प्रभवति लोभात्कामः प्रजायते । लोभान्मोहश्च नाशश्च लोभः पापस्य कारणम् ॥ २॥ ह्याप्रमाणे पाहिले तर पापाचे कारण जो लोभ तो जेथे निर्माण झाला, तेथे अत्यंत अनाचार घडून यावेत ह्यांत कांहीं नवल नाही. असफउद्दौला याच्या कारकीर्दीत वॉरन हेस्टिंग्ज ह्यांनी केले अयोध्येचे द्रव्यहरण व बेगमांवर केलेले अत्याचार प्रसिद्धच आहेत. त्याचे विस्तृत वर्णन करण्याच्या भरीस न पडतां असफउद्दौल्याच्या राजकीय चरित्रांतील अगदी ठोकळ ठोकळ गोष्टी संक्षेकरून खाली दिल्या आहेत. असफउद्दौला गादीवर बसला त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीने सुजाउद्दौल्याशी केलेला दोस्तीचा तह रद्द केला आणि अयोध्येचे रोसिडेंट मि० ब्रिस्टो यांनी एक नवीन तहाचा मसुदा पसंत केला. त्यामध्ये मुख्यत्वेकरून उभयपक्षांमध्ये स्नेह राहावा ; नबाबानें कंपनीच्या संमतीवांचून युरोपियन लोक नौकरीस ठेवू नयेत; दिल्लीच्या शहाअलम बादशहाने नबाबाविरुद्ध इंग्रजांस किंवा इंग्रजांविरुद्ध नबाबास काही गोष्टी सांगितल्यास तिकडे उभयतांनी लक्ष्य देऊं नये; कोरा व अलाहाबाद हे जिल्हे कंपनीनें नबाबाच्या अंमलांत द्यावेत; आणि बनारस, जानपूर, गाझीपूर आणि चेतसिंग -राजाच्या ताब्यांतील सर्व मुलूख मिळून २३ लक्षांचा प्रांत नबाबानें कंपनीस द्यावा ; इंग्रज सैन्याचा दरमहा खर्च सुजाउद्दौल्याचे कार