पान:अयोध्येचे नबाब.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. असफउद्दौला. (इ. स. १७७५-इ. स. १७९७ ). सुजाउद्दौला मृत्यु पावला त्या वेळी त्यास वडील मिर्झ अमानी व धाकटा सादतअल्ली असे दोन पुत्र होते. त्यांपैकी मिझी अमानी हा असफउद्दौला हे नांव धारण करून अयोध्येच्या गादीवर बसला. हा राज्याधिकार चालवू लागला त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हिंदुस्थानांत बरीच वाढली जाऊन, तिने अयोध्येवर आपला चांगलाच पगडा बसविला होता. दिल्लीचा बादशहा निर्बल व परतंत्र झाल्यामुळे मध्यवर्ती सार्वभौम सत्तेचा लोप झाला व दक्षिणेतील मराठ्यांचा उत्कर्ष होऊ लागला. परंतु महाराष्ट्रसत्तेस विरोध करून तिच्या संधशक्तीचा भंग करावा, आणि स्वतःचा फायदा करून हिंदुस्थानचे साम्राज्य आपणास प्राप्त करून घ्यावें, ह्या उद्देशाने पाश्चिमात्य राष्ट्राची त्या वेळी जी खटपट झाली, तीत दिल्लीपतीच्या आश्रयाने निर्माण झालेल्या व स्वातंत्र्योत्कर्षाने प्रबल व धनाढ्य बनलेल्या ह्या अयोध्या संस्थानाचे त्यास चांगले साहाय्य झाले, असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्या तर्फे ह्या वेळी वॉरन हेस्टिंग्ज हे हिंदुस्थानामध्ये गव्हरनर जनरल असून त्यांचे सर्व लक्ष्य स्वसत्तेची आभिवृद्धि करण्याकडे व तत्प्रीत्यर्थ लागणारे द्रव्य संपादन करण्याकडे विशेष होते. ह्या वेळी त्यांस अयोध्यासंस्थान हे उत्तम खाद्य सांपडून त्यांना त्यावर चांगला हात मारितां आला. नबाब असफउद्दौला ह्याची कारकीर्द म्हणजे वॉरन हेस्टिंग्ज ह्यांच्या अक्षम्य स्वार्थपटुतेचे प्रदर्शन आहे. त्यांस ह्या वेळी अनावर लोभ उत्पन्न झाल्या