पान:अयोध्येचे नबाब.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संस्थानिक ह्या सर्वांची संपूर्ण माहिती मिळणे अवश्य आहे. ही माहिती प्राप्त होईपर्यंत तो इतिहास कधीही परिपूर्ण होणार नाही. ह्याकरितां मराट्यांच्या इतिहासास साधनीभूत होणाऱ्या ह्या निरनिराळ्या भागांच्या माहितीचाही शोध करणे जरूर आहे. अशा प्रकारच्या शोधाचे फल प्रकृत ग्रंथ हा होय. - अयोध्येच्या इतिहासाचा संबंध मराठ्यांच्या इतिहासांशी फारच निकट आहे. येथील पहिले तीन नबाव-सादतखान, मनसूरअल्ली व सुजाउद्दौला हे मराठ्यांच्या उत्तरेकडील राजकारणांत समाविष्ट असून त्यांच्यापैकी शेवटचा नवाब सुजाउद्दौला ह्याने पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा कधीही विस्मरण न होण्यासारखा घात केला; परंतु मराठ्यांच्या रणशूर वीरांनी त्याचे प्रायश्चित त्यास दिले; हे इतिहासावरून कळून येते. तेव्हां ह्या तीन नबाबांचा व त्यांच्या वंशजांचा वृतांत समजणे जरूर आहे. दक्षिणेतील हैदराबादेप्रमाणे लखनौचे प्रचंड राज्य असून त्याच्या संपत्तीची व राज्यवैभवाची कीर्ति जुन्या लोकांच्या तोंडून ऐकू येते. परंतु तेथील नबाबांची माहिती महाराष्ट्रवाचकांस उपलब्ध नाही ही केवढी शोचनीय स्थिति आहे ? ही स्थिति नाहीशी होऊन तेथील इतिहासाचे आपणास ज्ञान व्हावें ह्या उद्देशाने हा ग्रंथ लिहिला आहे. ह्यांत अयोध्या संस्थानाची स्थापना होऊन ते खालसा होई. तोपर्यंत तेथे झालेल्या सर्व नबाबांची संक्षिप्त चरित्रे दिली आहेत. ती बोधपर व मनोरंजक होतील अशी आशा आहे. अयोध्येच्या इतिहासावर एके ठिकाणी संगतवार असे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे निरनिराळ्या इंग्रजी पुस्तकांच्या आधाराने ही माहिती जमा केली आहे. तींत क्वचित् दोष असण्याचाही संभव आहे. परंतु ह्या पुस्तकाचा उद्देश इतिहासजिज्ञासूंस अयोध्येच्या नबाबाची ओळख व्हावी व ह्या इतिहासाची समग्र साधनें प्रसिद्ध करण्याची त्यांस प्रेरणा व्हावी इतकाच आहे. अनुपलब्ध विषयावर ग्रंथ लिहितांना कितीही काळजी घेतली तरी त्यांत माहितीच्या अपूर्णत्वामुळे व संदिग्धतेमुळे दोष होण्याचा संभव असतो: हें सूज्ञ वाचकांस निराळे सांगावयास नकोच आहे. ह्या पुस्तकाचे कामी अयोध्येचे इंग्रजी ग्याझिटियर,