पान:अयोध्येचे नबाब.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

44 3७२ प्रस्तावना. Motom-- इतिहासाचे महत्त्व किती आहे हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. हॅरिसन नामक एका पाश्चात्य इतिहासशास्त्रवेत्याने एके ठिकाणी असें लिहिले आहे की, “आपल्या सर्व भावी आशा गतकालांतील गोष्टीच्या परिपक्व ज्ञानावर अवलंबून आहेत.” म्हणजे, मनुष्याच्या भावी उन्नतीच्या आशा इतिहासावर अवलंबून आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. ह्यावरून इतिहास हा मनुष्याच्या उन्नतीचे मूळ बीज आहे व त्याचे प्रकाशन व पुनरुज्जीवन करणे हे प्रत्येक राष्ट्रहितचिंतकाचे कर्तव्य आहे, असें मानिले पाहिजे. आजमित्तीस जी पाश्चात्य राष्ट्रे सुधारणेच्या व वैभवाच्या शिखरास पोहोंची आहेत, त्यांस ही उत्कर्षस्थिति प्राप्त होण्यास त्यांच्या राष्ट्राचा इतिहास पुष्कळ अंशी कारणीभूत झाला आहे. म्हणून त्यांस इतिहासाचे महात्म्य अतिशय वाटून तत्प्रकाशनार्थ त्यांचे बहुविध प्रयत्न एकसारखे चालले आहेत. हे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे देशांच्या इतिहासावरून दिसून येईल. पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशाची इतिहासाची साधने अद्यापि प्रसिद्ध नाहीत, तथापि त्या राष्ट्रापैकी एका प्रबल व प्रतापी राष्ट्राचा हिंदुस्थानाशी दृढ संबंध जडल्यामुळे त्याच्या संसर्गाने व संस्करणाने आमच्या देशाच्या इतिहासाची अभिरुचि व प्रीति आम्हांस वाटू लागली आहे ही संतोषाची गोष्ट होय. हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे विभिन्न राष्ट्रसमुत्ययाचा इतिहास आहे. त्याचे प्रकाशन करावयाचे म्हणजे प्रथम त्यांतील निरनिराळ्या भागांच्या इतिहासाची सामग्री सिद्ध करून ते प्रकाशित केले पाहिजेत. नंतर त्यांची संगति जुळवन सर्व राष्ट्रांचे परस्पर संबंध लक्ष्यात घेतले पाहिजेत. ह्यांवाचून त्या इतिहासाचे सोज्वल स्वरूप कधीही व्यक्त होणार नाही. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यसत्तेचा इतिहास जरी तयार करावयाचा झाला तरी त्यास दिल्लीचे मोंगल बादशहा; हैदरावाद. बंगाल आणि अयोध्या येथील मुसलमान सुभेदार; राजस्थानांतील रजपुत राजे; पंजाबांतले शीख राजे; कर्नाटकांत पाळेगार