पान:अयोध्येचे नबाब.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्या संस्थानचे पार्लमेंटरी पेपर्स, आर्यव्हिन, स्लीमन, लॉरेन्स ह्यांचे निरनिराळे लेख, ह्यांचा विशेषेकरून उपयोग झाला हे येथे कळविणे अवश्य आहे. पुस्तकाचे शेवटी, अयोध्या व लखनौ ह्या दोन इतिहासप्रसिद्ध स्थलांचे वर्णन दिले आहे. ह्या वर्णनापैकी काही भाग पुणे येथील 'केसरी' पत्रामध्ये 'उत्तर हिंदुस्थानांतील प्रवास' ह्या शिरोभागाखाली मागें प्रसिद्ध झाला होता. तो बहुतेक नवीन लिहून ह्या पुस्तकांत समाविष्ट केला आहे. त्याप्रमाणे लखनौच्या नबांबाची जी चित्रे उपलब्ध झाली तीही ह्यांत घातली आहेत. ह्या प्रयत्नाचा वाचकांनी स्वीकार केला ह्मणजे सर्व परिश्रमाचे चीज होईल. मुंबई. ता. २४-१२-९९. पुस्तककर्ता.