पान:अयोध्येचे नबाब.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५.wwwwwwwwww ४ था.] सुजाउद्दौला.. ठ्यांच्या पानिपत येथील अपयशास सुजाउद्दौला पुष्कळ अंशी कारणीभूत झाला. त्याचप्रमाणे, थोरले माधवराव पेशवे ह्यांच्या कारकीदीत मराठे सरदारांनी रोहिलखंड पादाक्रांत करून पुनः तेथे आपली सत्ता संस्थापित करण्याचा यत्न केला; त्या वेळीही सुजाउद्दौला इंग्रजांस अनुकूल होऊन त्याने त्यांच्या प्रगतीस पुष्कळ अडथळा केला, असे म्हणण्यास हरकत नाही. सुजाउद्दौल्याने बक्सार येथील लढाईत अपयश आल्यानंतर आपल्या सैन्याची सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष्य घातले. फ्रेंच लोकांच्या साहाय्याने त्याने आपल्या सैन्यास चांगली कवाईत शिकवून ते इंग्रज सैन्याच्या बरोबरीचें केलें. बक्सारच्या लढाईतही त्यास अपयश आले नसते, परंतु त्याचे गोलंदाज लोक फितूर होऊन त्यांनी तोफांमध्ये दारूगोळ्यांच्या ऐवजी गवताच्या पेंड्या भरल्या, त्यामुळे त्यास अपयश आले. सुजाउद्दौल्याने आपल्या कारकीर्दीत इतकी राजकारण केली व इतके रक्तपात केले तरी त्याने न्यायपद्धति व वसुलाची व्यवस्था चांगली ठेवून प्रजेस संतुष्ट केले होते. फ्रांक्लिन नामक इतिहासकाराने सुजाउद्दौल्याबद्दल असे लिहिले आहे की, "तो अत्युत्तम न्यायाधीश असून त्याच्या अंगी निःपक्षपातपणा हा गुण चांगला वसत होता, आणि त्याच्या हृदयांत स्वराज्योत्कर्षाची इच्छा नेहमी जागत होती.” जोनाथन स्कॉट ह्या इतिहासकाराने त्याची ह्यापेक्षाही विशेष स्तुति केली आहे. तो लिहितो:-" राजा ह्या नात्याने तो शाहणा व प्रौढ होता, व खाजगी गृहस्थ ह्या नात्याने तो फार सुशील, दयाळू व उदार होता. त्याजवर त्याच्या प्रजेचे अत्यंत प्रेम होते. एवढेच नव्हे, तर त्याच्या शत्रूस देखील तो प्रिय असे. रोहिल्यांचा पुढारी हाफिज रहिमतखान ह्याच्या पुत्रांनी त्याची मृत्युवार्ता ऐकून डोळ्यांतून आंसर्वे गाळिली." सुनाउद्दौला ह्याचे हिंदु व मुसलमान ह्यांवर सारखे प्रेम होते. त्याचा मुख्य दिवाण