पान:अयोध्येचे नबाब.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ अयोध्येचे नवाब. [भाग ...Arra wwwwwwwwwww द्दल वॉरन हेस्टिंग्ज ह्यांजवर भयंकर आरोप येऊन इंग्लंडमध्ये त्यांची चौकशी झाली. त्याचा संबंध प्रस्तुत विषयाशी नसल्यामुळे त्याबद्दल अधिक चर्चा करण्याचे येथे प्रयोजन नाही. ... रोहिल्यांचे युद्ध समाप्त झाल्यानंतर कलकत्ता कौन्सिलमध्ये वॉरन हेस्टिग्ज ह्यांच्या विरुद्धपक्षाचे प्राबल्य झाले; आणि त्यांनी वॉरन हेस्टिंग्ज ह्याची प्रत्येक कृति चुकीची ठरवून त्यांनी केलेली सर्व व्यवस्था रद्द केली. ह्या गडबडीमध्ये त्यांनी लखनौचा पूर्वीचा रेसिडेंट मिडलटन ह्यास काढून टाकून त्याच्या जागी ब्रिस्टो ह्या नांवाचा आपल्या वतीचा माणूस ठेविला. ह्या रेसिडेंटाबद्दल मोठ्या कडाक्याचा वाद माजून शेवटी वॉरन हेस्टिंग्जच्या पक्षाची सरशी होईपर्यंत तो लखनौ येथे कायम राहिला. हा वाद चालला असतांनाच सुजाउद्दौला फैजाबाद येथे ता० २६ जानेवारी इ० स० १७७५ रोजी मृत्यु पावला.* ह्याची कबर फैजाबाद येथे “गुलाबारी" ह्या नावाने प्रसिद्ध आहे. मुजाउद्दौला ह्याची कारकीर्द अतिशय महत्त्वाची आहे. मरा

  • सुजाउद्दौला ह्याच्या मृत्युबद्दल दोन निरनिराळ्या दंतकथा प्रचलित आहेत. “सियारुलमुताखरीन" ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की, हाफिज रहिमतखान ह्याचा वध करून रोहिलखंड कावीज केल्यानंतर सुजाउद्दौल्याने, हाफिज रहिमत ह्याच्या लावण्यवती कन्येवर वाईट दृष्टि ठेविली आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला; म्हणून तिने गुप्त रीतीने आपल्याजवळ विषदिग्ध कट्यार घेऊन ती सुजाउद्दौल्यावर चालविली. तिचे सविष टोंक त्याच्या शरीरांत जाउन त्यास जखम झाली व त्यामुळे तो वरेच दिवस आजारी पडून मृत्यु पावला. मि. कार्नेगी ह्यांनी सुजाउद्दौल्याच्या मृत्यूचे कारण त्याच्या विरुद्ध पक्षाची कलकत्ता कौन्सिलमधील सरशी हेही दिले आहे. पण -तें संभवनीय दिसत नाही.