पान:अयोध्येचे नबाब.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग ४ था. ] राजा वेणीबहादूर नामक एक हिंदु गृहस्थ होता. त्याचप्रमाणे पंडित काशीराज, गणेश वेदांती वगैरे महाराष्ट्र ब्राह्मण मुत्सद्दी त्याच्या पदरी होते. ह्याने मृत्युसमयीं आपलें राज्य व खजिना बापाच्यापेक्षा दुप्पट वाढवून ठेविला होता. स्वतःच्या कल्याणाकरिता ह्याने मराठ्यांशी जरी कृतघ्नपणा केला, तरी मराठ्यांविषयी त्याचे चांगले मत असे. मराठ्यांसही सजाउद्दौल्याचे सामर्थ्य माहित असून त्यांच्या दरबारांत सुजाउद्दौल्याचे बरेच वजन असे. मराठ्यांचे पराक्रमी सरदार विसाजी कृष्ण बिनिवाले ह्यांनी ज्या वेळी रोहित्यांचा सूड उगवून, शहाअलम बादशहास सुजाउद्दौल्यापासून हस्तगत करून घेतले; त्या वेळी थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांस स्वदस्तुरचे पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केलें, व सुजाउद्दौल्यासारख्या मातबर सरदाराची काही मात्रा चालू दिली नाही म्हणून त्यांची स्तुति केली. इंग्रज लोकही सुजाउद्दौल्याच्या स्नेहाचे महत्त्व लक्ष्यांत घेऊन त्याशी सलोख्याने वागत होते. त्यांनी, सुजाउद्दौल्याशी स्नेह करून, राहिले व मराठे ह्यांच्या राजकारणांत त्याची मदत घेतली नसती, तर इतिहासास निराळे स्वरूप प्राप्त झाले असते. असो... सुजाउद्दौल्याचे लग्न सफदरजंग ह्याचे कारकीर्दीत इ० स० १७४३ मध्ये झाले. त्याच्या बायकोचें नांव भाऊ बेगम अस होते. ही स्त्री त्याच्या पाठीमागे जीवंत होती. हिजपासून वारन हेस्टिग्ज ह्याने सक्तीने द्रव्य घेतल्यामुळे ही सुप्रसिद्ध वक्ता बके याच्या पार्लमेंटांतील जोरदार भाषणाने सर्व जगास ज्ञात झाली आहे. हिचा पुत्र मिा अमानी हा सुजाउद्दौल्याचे पश्चात् असफउद्दौला हे नांव धारण करून अयोध्येच्या गादीवर बसला.