पान:अयोध्येचे नबाब.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४:२१, १० ऑगस्ट २०२० (IST) ~ A R U . F . . . . . .nirnarwww ४ था.] सुजाउद्दौला. हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल होते. त्यांनी सुजाउद्दौल्याकडून फायदा करून घेण्याची ही चांगली संधि आहे असे पाहून, त्याची काशी येथे भेट घेतली व त्याजबरोबर नवीन तह केला. त्यांत अलहाबाद व कोरा हे प्रांत शहाअलम बादशहाकडे होते, ते त्याने मराठ्यांस दिले होते, परंतु तसे करण्यास त्यास अधिकार नाही, सबब ते प्रांत सुजाउद्दौल्यास विकत देऊन त्याजकडून ५० लाख रुपये घेण्याचा ठराव केला. त्याचप्रमाणे सुजाउद्दौल्याकडे जे इंग्रज सैन्य होते, त्याजबद्दल खर्चाची भानगड पडू नये म्हणून त्याने दरमहा २,१०,००० रुपये रोख द्यावेत असें ठरविले. ह्या सर्व गोष्टी सुरळीत चालण्याकरितां सुजाउद्दौला ह्याच्या दरबारी इंग्रजांचा एक वकील असावा अशीही वारन हेस्टिंग्ज ह्यांनी इच्छा दर्शविली. ती सुजाउदौल्याने मान्य केली. त्यामुळे मि० मिडलटन नामक एक रेसि. डेंट लखनौ येथे इ० स० १७७३ साली दाखल झाला. सुजाउद्दौला व रोहिले ह्यांची चुरस लागून सुजाउद्दौल्याने त्यांचा नाश करण्याकरितां इंग्रज सैन्याचे साहाय्य घेतले. रोहिल्यांच्या विरुद्ध इंग्रज सैन्य पाठवावें न. पाठवावे ह्याबद्दल कलकत्ता कौन्सिलमध्ये दुफळी झाली. शेवटी वॉरन हेस्टिंग्ज ह्यांनी, केवळ द्रव्यलोभाने, मुजाउद्दौल्यास मदत करून रोहिल्यांविरुद्ध लढण्याकरितां इंग्रज सैन्य त्याजकडे पाठविले. सुजाउद्दौला व रोहिला सरदार हाफिज रहिमतखान ह्यांची बाबुलनाला येथें ता० २३ एप्रिल इ० स० १७७४ रोजी लढाई झाली. तीत रोहिल्यांचा पराभव होऊन त्यांच्या सैन्याची सुजाउद्दौला व इंग्रज ह्यांनी भयंकर कत्तल केली व अतिशय लूट मिळविली. सुजाउद्दौल्यास ह्या कामी वॉरन हेस्टिंग्ज ह्यांनी केवळ द्रव्यलोभास्तव साहाय्य करून ब्रिटिश कीर्तीस अक्षय्य कलंक लाविला, म्हणून ह्या रोहिल्यांच्या युद्धाचे एक प्रकरण माजलें; व त्याब