पान:अयोध्येचे नबाब.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग पुनः थोरल्या माधवरावांच्या कारकीर्दीत उद्दीप्त झाला ; व मराठ्यांचे सरदार विसाजी कृष्ण बिनिवाले, रामचंद्र गणेश कानडे, तुकोजी होळकर, आणि महादजी शिंदे हे रोहिल्यांचा सूड उगविण्याकरितां, हळूहळू आपल्या हातांतून गेलेला प्रांत काबीज करीत करीत, दिल्ली व रोहिलखंड येथपर्यंत जाऊन पोहोचले. इंग्रज व सुजाउद्दौला ह्यांच्या अनुसंधानानें प्रयागक्षेत्री आयुष्य कमीत बसलेला बादशहा शहाअलम ह्यास दिल्लीपदावर आरुढ करून, दिल्लीच्या पादशाहीची सर्व सूत्रे आपण चालवावीत, अशी महत्वाकांक्षा त्यांस वाढू लागली, त्यांनी शुक्रताल येथे नजीबखान रोहिल्याचा पुत्र जाबताखान ह्याशी कढाई केली व त्यास कुमाऊनच्या पहाडामध्ये रेटिले. नंतर ते मोठ्या विजयानंदानें बादशहास बरोबर घेऊन दिल्ली येथे ता० २५ दिसेंबर इ० स० १७७१ रोजी दाखल झाले. तेथे त्यांनी सर्व वजिरांस अंकित करून बादशहास तक्तावर बसविले, आणि त्यांजकडून अलाहाबाद, कोरा, इटावा वगैरे प्रांतांच्या सनदा मराठ्यांस बक्षीस करून घेतल्या. रोहिले व मराठे ह्यांचे युद्ध चालले असतांना सुजाउद्दौला ह्याने रोहिल्यांस साहाय्य करून त्यांजकडून ४० लक्ष रुपये घेण्याचा ठराव केला. इंग्रजांस मराठ्यांशी टक्कर देण्यास कोणी तरी बलिष्ठ दोस्त पाहिजे होताच; तेव्हां त्यांनी सुजाउद्दौल्याशी दोस्ती राखून त्यास आपल्या तंत्रांत ठविले. सुजाउद्दौल्याने रोहिल्यांशी धरसोडीचे वर्तन ठेवून शेवटी इंग्रजांच्या साहाय्याने त्यांशी युद्ध मांडिलें. मराठे डोईजड होऊन अयोध्या पादाक्रांत करणार, अशी भीति उत्पन्न झाल्यामुळे मुजाउद्दौल्याने इंग्रज सैन्य मदतीस घेऊन जय्यत तयारी चालविली. त्याने चुनार व अलहाबाद हे दोन बळकट किल्ले. इंग्रज सैन्यास राहण्याकरितां दिले. ह्या वेळी वॉरन हेस्टिग्ज हे