पान:अयोध्येचे नबाब.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

comwww ५२ अयोध्येचे नबाब. [भाग आश्रयार्थ अयोध्येस आला, त्या वेळी त्याजबरोबर ८५ हत्ती नुसते द्रव्य भरलेले होते. त्याने सुजाउद्दौल्यास बंगालप्रांत सर करून दिल्यास दररोज एक लक्ष स्वारीखर्च व ३० लक्ष रुपये आणि पाटणाप्रांत बक्षीस देण्याचे कबूल केले. तेव्हां अर्थातच सुजाउद्दौल्यास मोह उत्पन्न होऊन तो बंगालप्रांतावर स्वारी करण्यास उद्युक्त झाला. नंतर शहाअलम, कासीमअल्ली व सुजाउद्दौला ह्या त्रिवर्गानी बक्सार येथे ता० १६ आक्टोबर इ० स० १७६४ रोजी इंग्रजांशी युद्ध केले. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला, तदनंतर शहाअलम इंग्रजांस जाऊन मिळाला. शहाअलम आपल्या ताब्यांत आला असें पाहून इंग्रजांनी त्याजकडून, "दिल्लीचा सार्वभौम बादशहा" ह्या नात्यानें, दिवाणी नामक एक सनद, ता० २९ डिसेंबर १७६४ रोजी लिहून घेतली; व तीत बंगाल, बहार व ओरिसा ह्या प्रांतांचे स्वामित्व आपल्याकडे घेऊन सुजाउद्दौल्याची सर्व जहागीरही त्यांत गोंवून घेतली. त्यापैकी कोरा व अलहाबाद हे दोन प्रांत शहाअलम बादशहाकडे ठेविले; आणि आपणाकडे काशी, गाझीपूर हे दोन सुपीक परगणे लावून घेतले. बादशहाची राजरोस फर्मान मिळतांच इंग्रजांनी सुजाउद्दौल्याचे पारिपत्य करून त्यास जेरीस आणण्याचा विचार केला. त्यांच्या व त्याच्या लहान लहान चकमकी सुरू झाल्या. शेवटी कोरा येथे ता० ३ मे इ० स० १७६५ रोजी त्याचा चांगला पराभव होऊन, त्यास इंग्रजांशी तह करणे भाग पडले. ह्याच समयास इंग्लंडांतील कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ह्यांजकडून कलकत्त्यास असे लिहून आले की, "अयोध्या हा सुजाउद्दौल्याचा प्रांत असून तो बादशहाचे मार्फत आपल्या ताब्यात घेणे ईस्ट इंडिया कंपनीस अहितकारक आहे. ह्याकरितां मराठ्यांच्या स्वान्यांपासून कंपनीच्या मुलखाचे संरक्षण करण्याकरितां