पान:अयोध्येचे नबाब.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

www.rime ४ था.] . सुजाउद्दौला. सुभेदारी मिळवून द्यावी, व तेथील प्लासीच्या लढाईपासून सत्ताधारी बनलेल्या इंग्रज लोकांस घालवून द्यावे, असा सुजाउद्दौल्याचा विचार होता. अल्लीगोहर हा काही सैन्य जमवून बंगाल प्रांतावर चाल करून गेला, परंतु लॉर्ड क्लाइव्ह ह्यानीं कांही पैसे देऊ करून त्यास कर्मनाशा नदीपासून परत फिरविले. तेव्हां तो पुनः सुजाउद्दौला ह्याच्या ताब्यात येऊन राहिला. तो इकडे गाझीउद्दीन ह्यानें, इ० स० १७५९ मध्ये, त्याच्या दुर्दैवी बापास-अलमगीर ह्यास-ठार मारिलें, व कांहीं दिवस दिल्ली येथे झोटिंगपादशाही चालविली. अल्लीगोहर ह्याने आपणास शहाअलम हे नांव धारण करून सुजाउद्दौल्यास वजिरी दिली व हरत-हेनें दिल्लीचे सिंहासन प्राप्त करून घेण्याचा यत्न चालविला. ह्या समयीं, त्यास जो बादशाही देईल तो आपला मित्र, अशी त्याची स्थिति झाल्यामुळे, सुजाउद्दौला, फिरंगी व मराठे ह्या तिघांकडेही त्याने राजकारण लाविले. मराठ्यांना अबदाल्लीचा व रोहिल्यांचा नाश करावयाचा असल्यामुळे, त्यांनी पूर्वीच अल्लीगोहर ह्यास, दिल्लीचा बादशहा असें प्रसिद्ध करून, आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो सिद्धीस गेला नाही. कारण, अल्लीगोहर हा पानिपतच्या युद्धामध्ये तटस्थ राहिला होता. तदनंतर त्याने सुजाउद्दौल्याचेच विशेष प्राबल्य आहे असे पाहून त्याचाच आश्रय केला. सजाउद्दौला ह्यास मदतीस घेऊन बंगालप्रांत सर करण्याची मराठ्यांची पूर्वी इच्छा होती, परंतु पानिपताच्या अपजयामुळे ती सिद्धीस गेली नाही. तेव्हां सुजाउद्दौल्याने बादशहा आपल्या हाती आला आहे असे पाहून बंगालप्रांतावर स्वारी करावी व इंग्रजांस घालवून द्यावे असा संकेत केला. - ह्या समयास इंग्रजांनी पदच्युत केलेला बंगालचा नबाब कासीम अल्ली हा पाटणा येथे इंग्रजांची कत्तल करून सुजाउद्दौल्याच्या