पान:अयोध्येचे नबाब.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग anwarwwwnwwwwvie विली व द्वाही फिरविली." असो. सुजाउद्दौला ह्याने प्रत्यक्ष पुढाकार घेतला असो किंवा नसो, परंतु तो नजीबखान रोहिल्याच्या गोड भुलथापीस भुलून अबदालीस साहाय्य झाला, व त्यामुळे अबदाल्लीचा पक्ष प्रबल होऊन त्यास मराठ्यांचा पराभव करितां आला ही गोष्ट निर्विवाद आहे. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्यामुळे सुजाउद्दौला च राहिले ह्यांस, मराठ्यांच्या ताब्यांतील सर्व ठाणी परत घेऊन, रोहिलखंड व दुआब ह्यांमधील प्रांतावर आपला अंमल बसविण्यास मुळीच प्रयास पडले नाहीत. मुजाउद्दौल्याने झांशीपर्यंत ठाणी घेतली व मराठ्यांच्या हल्यामुळे नाहीसा झालेला आपला सर्व प्रांत पुनः काबीज केला. तात्पर्य, मराठ्यांच्या अमजयामुळे त्यास आपला फायदा करून घेण्याची उत्तम संधि मिळाली, व त्याप्रमाणे त्याने अयोध्येची विशेष भरभराट केली. तथापि, कालांच्या चक्रनेमिक्रमणाप्रमाणे त्यावरही लवकरच परराष्ट्रीयांचा पगडा बसून त्यास दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याचा प्रसंग आला. तो निवेदन करण्यापूर्वी दिल्लीच्या राजकारस्थानांचे सिंहावलोकन करणे जरूर आहे. वजीर गाझीउद्दीन हा दिल्लीदरबारी अत्यंत प्रबल होऊन, त्याने स्वसंस्थापित बादशहा अलमगीर ह्यास सक्त नजरकैदेमध्ये ठेविले व त्याच्या बायकामुलांचे हाल मांडिले. तेव्हां बादशहाचा मुलगा अल्लीगोहर हा दिल्लीहून पळून गेला, व तो कोणाचा तरी आश्रय मिळावा म्हणून यत्न करू लागला. शेवटी इ० स० १७५८ मध्ये तो सुजाउद्दौल्याच्या राजधानीत आला. सुजाउद्दौल्याने दिल्लीच्या सार्वभौम राजसत्तेची सूत्रे आपल्या हाती अनायासे येतात असे पाहून त्याचा आदरसत्कार केला; व त्यास मदत करण्याचे कबूल केले. अल्लीगोहर हा बादशहाचा औरस पुत्र असल्यामुळे त्यास बंगालची