पान:अयोध्येचे नबाब.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ था. ] सुजाउद्दौला. Manorrrrrrrrrrrrrrrrrrrrr उद्दौल्याजवळ फार खटपट केली. परंतु ही बातमी दुर्दैवाने पाषाणहृदयी व कृतघ्न नजीबखानास कळली, व त्याने त्यापूर्वीच जनकोजीचा वध करून आपली नीच तृष्णा तृप्त केली ! तथापि काशीराजाने अनुपगीर गोसाव्यास आपल्या मदतीस घेऊन जनकोजी शिंद्याच्या प्रेताचें हिंदुधर्माप्रमाणे दहन केले. त्याचप्रमाणे विश्वासरावप्रभृति मराठे वीरांची प्रेते त्याने मोठ्या मिनतवारीने व सुजाउद्दौल्याच्या मध्यस्तीनें हस्तगत करून घेऊन त्यांचीही उत्तम प्रकारे व्यवस्था केली. ह्याच गृहस्थाने जीवंत सांपडलेल्या मराठ्यांस गुप्त रीतीने दीगपर्यंत पोहोंचविण्याची खटपट करून सुरजमल जाटाकडून त्यांचे रक्षण करविले व त्यांना सुरक्षित रीतीने महाराष्ट्रदेशी पाठविण्याचीही तजवीज केली. ह्या प्रसंगाचे . काशीराजाचे उपकार मराठ्यांवर इतके अगणित आहेत की ते वर्णन करणे शक्य नाही. परंतु इतिहासाच्या अभावामुळे ते विस्मृतीच्या अंधःकारमय मंदिरांत लपून गेले आहेत व ते करणारा महाथोर पुरुष काशीराज हाही त्यांच्या बरोबर त्या मंदिरांत वास करीत आहे !! पंडित काशीराज ह्याच्या माहितीप्रमाणे पाहिले तर मुजाउदौला तटस्थ राहून त्याने ह्या युद्धामध्ये विशेष पुढाकार घेतला नाही असे दिसते. परंतु डो व फ्रांक्लिन ह्यांच्या माहितीप्रमाणे पाहिले, तर त्याचेच पराक्रम अबदाल्लीस विजयश्री आळविण्यास कारणीभूत झाले असे दिसते. फ्रांक्लिन ह्याने शहाअलम बादशहाच्या चरित्रामध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की, " नबाब सुजाउद्दौला ह्याच्याच पराक्रमामुळे व चातुर्यामुळे अबदाल्लीस यश प्राप्त झाले; म्हणून त्याने त्यास अभिनंदनपूर्वक मोठमोठ्या देणग्या देऊन त्याचा फार गौरव केला. त्याने त्यास प्रेमभराने आलिंगन देऊन व पुत्रवत् मानून त्याचे कौतुक केले, आणि त्याच्याच नांवाने विजयाची रणशिंगें वाज 4