पान:अयोध्येचे नबाब.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८. अयोध्येचे नबाब. [भाग हृदयांत दयेचे पाझर फोडून त्याच्याकडून मराठ्यांच्या प्रेतांची यथाविधि उत्तरक्रिया करण्याची परवानगी मिळविली. ह्या प्रसंगाची पंडित काशीराज ह्याने जी हकीकत लिहिली आहे ती फारच हृदयद्रावक आहे. भारती युद्धांतील धष्टद्युम्नतुल्य रणपटु योद्धा जनकोजी शिंदा हा तोफेचा गोळा लागून व हातामध्ये भाल्याची जखम लागून रणांगणी पडला, त्या वेळी त्यास गिलच्यांनी पकडून आपल्या तंबूमध्ये नेऊन ठेविले. तेथे काशीराजाने आपला प्रवेश करून त्याची भेट घेतली. त्या वेळी पंडित काशीराजास पाहून जनकोजीनें खाली मान घातली. तेव्हां काशीराजाने आपल्या धैर्य देणाऱ्या, उदार, दयापूर्ण व प्रेमळ वाणीने त्यास असे सांगितले की, "तुह्मांस असें खाली मान घालण्याचे प्रयोजन नाही. वीराचा पुरुषार्थ म्हणून जो आहे तो तुह्मीं पूर्ण रीतीनें गाजविला आहे, आणि तुमची शौर्यकीर्ति यावच्चंद्रदिवाकरौ कायम राहील इतकी विमल आहे. मग तुम्हांस खिन्न होण्याचे कारण काय?" तेव्हां जनकोजीनें आशायुक्त मुद्रेनें इतकेच सांगितले की, "ते खरे आहे. परंतु मी रणांत मेलो असतो तर फार बरे झाले असते. परंतु माझ्या दुर्दैवाने मला येथे आणिलें आहे! हे लोक आतां मजजवळ ७ लक्ष रुपये खंडणी मागत आहेत. मी ही खंडणी देखील दिली असती, परंतु अशा प्रसंगी ती मला कोठून मिळणार ? ह्याकरितां तुम्ही माझ्या वडिलांचा व आपला पूर्वीचा ऋणानुबंध स्मरून व तुमच्या नबाबास आमच्या घराण्याचा पूर्वस्नेह व उपकार ह्यांची ओळख देऊन, त्याजकडून जर ही खंडणी देववाल व शत्रूच्या हातांतून मला मुक्त कराल, तर मजवर आपले महत उपकार होतील." काशीराजास हे भाषण ऐकून अत्यंत गहिवर आला व त्याने त्यास ही खंडणी मिळवून देण्याचा यत्न करितों असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे काशीराज ह्याने जनकोजी शिंदे ह्याच्या मुक्ततेकरितां सुजा