पान:अयोध्येचे नबाब.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwwwwwwwww www.ammar ४ था.] सुजाउद्दौला. wwwwwwwwwww ल्याचा मुकद्दमा तसाच तहकूब ठेविला व रोहिल्याशी न झुंजतां तो अबदाल्लीकडे वळला. सुजाउद्दौल्यास आपल्यावरचे संकट टळलें असें वाटून तो अयोध्येस गेला व तेथे स्वस्थ राहिला.. सुजाउद्दौला हा मातबर मुसलमान सरदार असल्यामुळे त्याच्या मदतीची मराठे व गिलचे एकसारखीच अपेक्षा करीत होते. सुजाउद्दौला अनुकूळ झाला तर रोहिल्यांचे पारिपत्य करण्यास फार उत्कृष्ट साधन होईल व त्याच्या मदतीने अबदालीस तेव्हांच जेर करितां येईल अशी मराठ्यांस उमेद होती. तिकडे अबदाल्लीसही सुजाउद्दौल्यासारखा प्रबल मुसलमान अनुकूल झाला म्हणजे सर्व मुसलमान संस्थानिक आपणास अनुकूळ होतील अशी खात्री होती. म्हणून मराठे व अबदाल्ली ह्यांनी सुजाउद्दौल्यास आपापल्या पक्षास ओढण्याचा एकसारखा प्रयत्न चालविला होता. मराठ्यांनी शामजी रंगनाथ नामक आपला वकील सुजाउद्दौल्यापाशी ठेविला होता. तिकडे अबदाल्लीने नजीबखान व जहानखान ह्या दोन पठाण सरदारांस सजाउद्दौल्याकडे पाठविले होते. त्यांनी इटावा, सकुराबाद वगैरे मराठ्यांची ठाणी घेऊन सुजाउद्दौल्यापर्यंत प्रवेश केला. त्यांची व सुजाउद्दौल्याची बिठूर येथे गांठ पडून त्यांनी सुजाउद्दौल्यास कानमंत्र सांगितला व त्याला आपल्याकडे पूर्णपणे वळविलें. मुजाउद्दौला प्रतिपक्षास मिळाला ही मराठ्यांच्या राजकारणास फारच विघातक गोष्ट झाली, व त्यामुळे त्यांचे सर्वस्वी नुकसान झाले. सुजाउद्दौल्याची व नजीबखानाची भेट होऊ न देतां त्यास अलिप्त राखणे फार जरूर होते, परंतु काही मराठे सरदारांच्या कुचराईमुळे ती गोष्ट घडली नाही असे कित्येकांचे मत आहे.* सुजाउद्दौल्याची व नजीबखानाची भेट झाली तेव्हां अबदाल्ली अनपशहरी होता. ह्याकरितां एकदोन मराठे सरदारांनी निवडक सैन्या- * रा. राजवाडेकृत "मराठ्यांच्या इतिहासाची साधनें."