पान:अयोध्येचे नबाब.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग निशी अंतर्वेदर्दीत सुजाउद्दौला व नजीबखान ह्यांवर चाल करून त्यांस पेंचांत आणावे व आकस्मिक अबदालीवर तुटून पडून त्यास बुडवावें असाही सदाशिवरावभाऊ ह्यांनी बूट काढिला होता, परंतु तोही दुर्दैवाने सिद्धीस गेला नाही. शेवटी सुजाउद्दौला व नजीबखान हे मराव्यांच्या तावडीतून निसटून, शिकंदरा येथे अबदाल्लीस जाऊन मिळाले, व सर्वांनी मिळून मराठ्यांच्या नाशाचा उद्योग आरंभिला. सुजाउद्दौला अबदाल्लीस मिळाल्यानंतर त्याने त्याजपाशी खूप पैसा मागितला व मारेकरी घातले म्हणून त्याला अबदाल्लीचा पक्ष सोडण्याचीही इच्छा झाली. त्याने काही दिवस पुनः मराठ्यांशी सलोख्याचा पत्रव्यवहार चालू केला. सुजाउद्दौल्यास नादी लावण्यास नजीबखान रोहिला मूळ कारण होता. त्याच्या मनांत अबदाल्लीस पादशाहत देऊन सुजाउद्दौल्यास वजिरी द्यावी व आपण बक्षीगिरी मिळवावी; आणि मराठ्यांचा समूळ विध्वंस करून रोहिलखंडावर निर्धात राज्य करावे हा आपमतलबी हेतु घोळत होता. त्यामुळे त्याने युक्तिप्रयुक्ति करून व सुजाउद्दौल्यास आपल्या पक्षांत बळकट धरून मराठ्यांचा उच्छेद केला. सुजाउद्दौल्याच्या साहाय्यामुळे अबदाल्लीस जोर चढून इ० स० १७६१ च्या जानेवारी महिन्यांत त्याचे व मराठ्यांचे झालेकै पानिपत येथील घनघोर रणकंदन इतिहासप्रसिद्धच आहे. पानिपतच्या युद्धाचे साद्यंत वर्णन मराठी बखरीमध्ये उपलब्ध आहे. तेव्हां त्या संबंधाने चर्वितचर्वण करण्याची आवश्यकता नाही. तथापि ह्याच युद्धासंबंधानें खुद्द सुजाउद्दौल्याच्या पदरच्या एका गृहस्थाने समक्ष पाहिलेली हकीकत फारशी भाषेत लिहिली आहे. त्याची माहिती येथे सादर करणे अत्यंत जरूर आहे. सुजाउद्दौल्याचा बाप वजीर सफदरजंग ह्यास मराठ्यांनी इ० स० १७५० मध्ये उत्तम