पान:अयोध्येचे नबाब.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग maraman mmmmmmmmmmrrrrrrrrrmirmwammmmmm शाहीत जीव राहिला नाही. तेव्हां सुजाउद्दौल्याच्या ह्या वरकरणी थापा आहेत की काय, ह्याचाही सुरजमल्ल जाट व गोविंदपंत बुंदेले यांच्या मार्फतीने शोध करून व एखादा इतबारी शहाणा माणूस तिकडे पाठवून, सर्व रागरंग पहावा; अशीही पेशव्यांनी त्यांस सूचना केली होती. त्यांचा मुख्य मनसबा सजाउद्दौल्यास अनुकूल करून घेऊन, काशी प्रयाग व पन्नास लाख रुपये रोख घेणे हा होताच, तथापि सजाउद्दौल्यास सामील करून बंगाला सर करावा व मातबर पैसा मिळवावा, ह्या पुढील लाभावर त्यांची दृष्टि विशेष होती.* मुजाउद्दौल्याने ही गोष्ट अमलांत न आणितां आपल्या गोड गोड थापांनी मराठ्यांस कांहीं कालपर्यंत नादी मात्र लाविले होते. इ० स० १७५८ मध्ये राघोबादादांनी लाहोरपर्यंत चाल करून तेथील बंदोबस्त केला. त्या गडबडीत सुजाउद्दौल्यावरील मोहीम सिद्धीस गेली नाही. तेव्हां त्यांनी व विठ्ठल शिवदेव विंचूरकर ह्यांनी त्याजपासून बारा लक्ष रुपये खंडणी घेऊन त्या वर्षापुरता निकाल केला. परंतु पुनः १७९९ मध्ये दत्ताजी शिंदे ह्यास नानासाहेबांनी काशी प्रयाग हस्तगत करून बंगाल्यावर मोहीम करावी व तेथे मराठ्यांचा अंमल बसवावा म्हणून महत्त्वाची कामगिरी सांगि-तली. त्याप्रमाणे दत्ताजी शिंदे हा इ० स० १७९९ च्या मे महि. न्यांत अंतर्वेदीत शिरून नजीबखान रोहिल्याचा पिच्छा पुरवू लागला. रोहिलखंडामध्ये त्याने इतकी धामधूम मांडली की, एका महिन्यामध्ये १३०० गांवे त्याने लुटून फस्त केली. हे मराठ्यांचे अरिष्ट अयोध्येवर येणार असें पाहून सुजाउद्दौल्याने नजीबखानाशी गुप्त तह केला व त्याच्या मदतीस जाऊन त्याने मराठ्यांवर चाल केली. इतक्यांत अबदाल्लीचे संकट आल्यामुळे दत्ताजी शिंदे ह्याने रोहि* “पत्रं यादी वगैरे" लेखांक ३८७-३८८.