पान:अयोध्येचे नबाब.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ था.] सुजाउद्दौला. ४३ जोरावर काशी, प्रयाग ही पुण्यक्षेत्रे सर करणे शक्य नाही असें पाहून त्यांनी सुजाउद्दौल्याची मनधरणी करून गोडीगुलाबीनेच ती मिळविण्याची खटपट चालविली होती. सुजाउद्दौला मराठ्यांशी स्नेहभावानें अंतःकरणपूर्वक वागत नसून बाह्यात्कारें मात्र लोभ दाखवीत असे. मराठ्यांचे प्राबल्य त्यास सहन होत नसून तो आंतून नजीबखान रोहिल्याशी मित्रत्वाने वागत असे. परंतु त्यास वेळोवेळी मराठ्यांची मदत लागे, म्हणून त्याला मराठ्यांचा बाह्यतः स्नेह ठेवणे भाग पडत असे. अबदाल्ली दिल्लीहून इ० स० १७९७ मध्ये परत गेल्यानंतर मराठ्यांनी गाझीउद्दीनाचा पक्ष घेतला व नजीबखानाचा पराभव करून त्यास रोहिलखंडांत पिटाळून लावले. त्या समयीं त्याने दिल्लीची वजिरी प्राप्त करून घेण्याकरितां मराठ्यांस ५० लक्ष रुपये व काशी, प्रयाग ही महाक्षेत्रे देण्याचे बोलणे लाविले होते. सुजाउद्दौल्याच्या बोलण्यांत खरेपणा कमी आहे अशी मराठ्यांची खात्री होतीच; तथापि त्यांनी जुळल्यास त्याचे म्हणणे कबूल करण्याचा विचार केला होता. ह्या संबंधाने बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी दत्ताजी व जनकोजी शिंदे व त्यांचे दिवाण रामाजी अनंत दाभोळकर ह्यांस असे लिहिले होते की, “गाझीउद्दीनखानास आपणच दिवाणगिरी दिली आहे. त्याने करारांत अंतर पाडले तर त्याची भीड कशास पाहिजे? मनसूरअल्लीचा मुलगा सुजाउद्दौला ह्याने काशी, प्रयाग देण्याचे मागेंच ( इ० स० १७५५ साली ) दादासाहेबांजवळ कबूल केले आहे. जर त्यास वजिरी देणे असेल तर काशी व प्रयाग ही दोन तीन स्थळे व पन्नास लाख रुपये ताबडतोब रोख घ्यावे व मग त्यास वजिरात द्यावी." दिल्लीच्या वजिरातीची योग्यता पूर्वी आधिक होती, त्यामुळे. सजाउद्दौल्याचा बाप वजिरीसाठी लाळ घोटीत होता. आतां पाद