पान:अयोध्येचे नबाब.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨ अयोध्येचे नबाब. [ भागा w झाला, अशीही आख्यायिका प्रसिद्ध आहे. अर्थात् मनगटाच्या . * ह्या संबंधाने पेशव्यांच्या बखरीमध्ये पुढील आख्यायिका प्रसिद्ध आहे:"श्रीमंत नानासाहेब पेशवे हिंदुस्थानच्या स्वारीस गेले. तेथे जाऊन मुलखाच्या खंडण्या वगैरे घेऊन माघारे फिरले. त्या वेळेस श्रीमंतांचे मनांत गोष्ट वागली की, काशीस जाऊन काशी घ्यावी. ह्या बेताने स्वारीच्या ढाला पाठीमागे काशीकडे फिरविल्या. पुढे काशीच्या अलीकडे १५ । १६ कोशावर मुक्काम झाला. त्या समयी काशीस सुजाउद्दौला राज्य करीत होता. त्यास असा मजकूर समजला की, पेशवे काशी घ्यावयास येतात. हा मजकूर पक्का त्याजला समजतांच घाबरून सर्व क्षेत्रींचे ब्राह्मण जमा करून आणिले. त्या वेळेस नारायण दीक्षित पाटणकर हे काशीस होते. तेही त्याने आणिले. तेव्हां सुजाउद्दौला याने सर्वास सांगितले की, “तुमचे ब्राह्मण राजे काशी घ्यावयास येतात. त्यांस माघारें फिरवावें, नाहीतर तुम्हां सर्वास मुसलमान करीन.” अशी जरब सुजाउद्दौला याने देतांच सारे ब्राह्मण भिऊन सुजाउद्दौल्यास बोलले की, “आह्मी त्यास माघारें फिरवितो." असे बोलून तीन चारशें ब्राह्मण दीक्षितसुद्धा काशीतून उघडे बोडके निघाले, ते नीट श्रीमंतांचे लष्करांत चार सहा घटका रात्रीस येऊन पोहोचले. ते ब्राह्मण आले हे पाहून नानासाहेब डेऱ्याबाहेर येऊन उभे राहिले. दीक्षित पाटणकर यांस पाहून श्रीमंत म्हणतात की, "असे उघडे बोडके का आला?" त्या वेळेस नारायण दीक्षित ह्यांनी श्रीमंतांस सांगितले की असा मजकूर झाला. तेव्हां आमचें ब्राह्मणपण राखावयाचे असल्यास आपण माघारें फिरावे, हे चांगले.” असा मजकूर ऐकून श्रीमंत दीक्षितांस म्हणतात; "इतक्या ब्राह्मणांस दुःख आह्मांसाठी होते, तेव्हां या गोष्टीची गरज आह्मांस नाही. आपण स्वस्थ असावें." x x x असें अभय देऊन श्रीमंतांनी काशीच्या स्वारीचा बेत रहित केला व आपण गुप्तरूपाने ब्राह्मणमंडळींत शिरून गंगास्नान करून आले. या हकीकतीमध्ये अकालवर्तित्वाची काही चूक झाली असावी असे दिसते. कारण, नानासाहेब उत्तर हिंदुस्थानांत जाऊन गंगास्नान करून इ.स. १७४३ ह्या वर्षी आले असा उल्लेख सापडतो. ह्या वेळी मनसूरअल्ली हा अयोध्येचा नबाब होता. तेव्हां ही गोष्ट सुजाउद्दौल्याचे कारकीर्दीत घडली असे म्हणणे विसंगत दिसतें.