पान:अयोध्येचे नबाब.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ था.] सुजाउद्दौला. wwwwwwwwwwww इकडे गाझीउद्दीन ह्याने मराठ्यांशी सख्य करून त्यांच्या मदतीने दिल्लीवर पुनः चाल केली व दिल्ली हस्तगत करून घेऊन नजीबखानास रोहिलखंडामध्ये पळवून लाविले. नजीबखानाचा पुरा सूड मराठ्यांनी उगविला असता, परंतु त्याने मल्हारराव होळकरास शरण जाऊन त्यास "मी तुमचा धर्मपुत्र आहे, माझें रक्षण करावे" अशी प्रार्थना करून त्याजकडून अभय मिळविले होते, त्यामुळे तो बचावला गेला. नजीबखान मराठ्यांचा कट्टा शत्रु असून त्यानेच अबदाल्लीस हिंदुस्थानांत येण्याबद्दल पाचारण केले होते. त्याने मराठ्यांचा वरपगडा पाहतांच त्यास ३० लक्ष रुपये कबूल करून बक्षीगिरी देण्याविषयी बोलणे लाविले होते. परंतु तो “पुरा हरामखोर बाट (लुच्चा)" असून " तो दिल्लीत प्रविष्ट जाहलिया अबदाल्लीचेच दिल्लीत ठाणे बसलेसें जाणावे. बेमान हरामखोर आहे. त्यास वाढविणे सर्पास दूध पाजण्यासारखे आहे. फावलेमानी त्याचे पारिपत्य करावें*" असा श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी त्या वेळी मराठ्यांचे सरदार दत्तोजी व जनकोजी शिंदे ह्यांस उपदेशही केला होता. असे असून मल्हारराव होळकराने त्यास ह्या वेळी पाठीशी घेतले ही मराठ्यांस फार हानिकारक गोष्ट झाली. ___ सुजाउद्दौल्याचा बाप मनसूरअल्ली सफदरजंग ह्याचे वेळेपासून काशी, प्रयाग व अयोध्या ही हिंदूंची क्षेत्रे आपल्या ताब्यात घ्यावीत असा पेशव्यांचा व मराठे सरदारांचा फार हेतु होता. एके वेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी काशी हस्तगत करण्याकरितां काशीवर स्वारी करण्याचाही विचार केला होता, परंतु तेथील ब्राह्मणांस मुसलमान करण्याची तृप्ति सुजाउद्दौल्याने काढल्यामुळे त्यांचा विचार रहित

  • “पत्रे, यादी वगैरे' लेखांक ३६२.