पान:अयोध्येचे नबाब.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

سی अयोध्येचे नबाब. [भाग तात्पर्य, ज्याप्रमाणे वनामध्ये एखादें भक्ष्य सांपडले म्हणजे त्यावर सर्व हिंस्र श्वापदांची एकदम उडी पडते व त्यांत जो अधिक बलवान् व अधिक धूर्त असतो त्यास यश मिळते, त्याप्रमाणे सध्यांची स्थिति झाली होती. ह्या वेळी मराठ्यांच्या सत्तेचा जोर सर्वात अधिक वाढला होता. त्यांची ठाणी राजपुताना, माळवा, अंतर्वेद, दिल्ली रोहिलखंड, बुंदेलखंड ह्या सर्व प्रांतांमध्ये अनेक जागी बसली होती; आणि त्यांचे प्राबल्य इतके वाढले होते की, दिल्लीची बादशाही समूळ लयास जाऊन लवकरच मराठ्यांचा भगवा झेंडा इंद्रप्रस्थावर मोठ्या डौलाने फडकत राहण्याची वेळ आली होती. दिल्लीचा वजीर गाझीउद्दीन, रोहिला सरदार नजीबखान, आणि अयोध्येचा नबाब सुजाउद्दौला ह्या तिघांनी मराठ्यांशी विनम्र होऊन आपला भाग्योदय करून घेण्याकरितां आपसांत चढाओढ लाविली होती, असें म्हटले असतां हरकत नाही. इ० स० १७५४ पासून इ० स० १७५८ पर्यंत ज्या घडामोडी झाल्या त्यांमध्ये ह्या तीन महत्त्वाकांक्षी पुरुषांच्या वादामुळे मराठ्यांचा फार फायदा झाला असेंच दिसून येईल. इ०स० १७५४ मध्ये वजीर गाझीउद्दीन ह्याने अहमदशहा बादशहास पदच्युत करून दिल्लीची सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली हे मागें सांगितलेच आहे. तेव्हापासून त्याने सुजाउद्दौला व नजीबखान ह्यांच्या प्रांतांवर जास्त खंडणी बसवून ती जबरदस्तीने वसूल करण्याचा यत्न चालविला होता. त्याने मराठ्यांस वश करून व त्यांस कांही लाख रुपये कबूल करून दिल्लीची वजिरी आपले हातून न जावी अशी खटपट चालविली होती. इतक्यांत इ०स० १७५६ मध्ये अहमदशहा अबदाल्ली ह्याने हिंदुस्थानावर स्वारी केली. त्याने दिल्ली, मथुरा वैगेरे शहरें लुटली, आणि नजीबखान राहिल्यास अलमगीर बादशहाचा मुख्य प्रधान व सेनापति नेमून तो निघून गेला.