पान:अयोध्येचे नबाब.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ था.] . सुजाउद्दौला. ३९ पभोगांची व चैनीची संवय लागली असावी हे उघड आहे. अयोध्येचा राज्यकारभार त्याचे हाती आल्यावर हळू हळू त्याचे मन राजकारणाकडे लागत चालले. के सुजाउद्दौला अयोध्येचा सुभेदार झाला त्या वेळी दिल्लीदरबारांत सर्व घोटाळा झाला होता. मीर शहाबुद्दीन ऊर्फ गाझीउद्दीन हा सर्वसत्ताधिकारी होऊन त्याने बादशहा दुसरा अलमगीर ह्यास आपल्या कैदेमध्ये ठेविले होते. बादशहाजादा अल्लीगोहर हा आपला पक्ष स्वतंत्र व्हावा एवढ्याकरितां चोहीकडे आश्रय शोधीत होता. रोहिल्यांचा पुढारी नजीबखान हा आपले वर्चस्व दिल्लीदरबारी स्थापन करून वजिरीची सूत्रे आपल्या हाती यावीत व रोहिलखंडावर आपला अंमल अबाधित चालावा म्हणून यत्न करीत होता. उत्तरेकडे अहमदशहा अबदाल्ली हा दिल्ली पादाक्रांत करून हिंदुस्थानांतील अपार संपत्ति स्वदेशी नेण्याकरितां एकसारखा झटत होता. दक्षिणेकडे मराठे सरदार शिंदे होळकर, आणि त्यांचे प्रमुख सेनापति पेशवे राघोबादादा हे रजपुतांशी युद्धे करून व त्यांच्यावर खंडण्या लादून दिल्लीच्या दरवाज्यापर्यंत जाऊन पोहोचले होते, आणि ज्याच्या मार्फत दिल्लीपदपादशाहीची सूत्रे आपल्या हाती येतील व आपले कोटकल्याण होईल त्यास हाताशी घेऊन अंतःप्रवेश करण्याचा त्यांचा यत्न चालला होता. ह्या सर्वीप्रमाणे सुजाउद्दौला हाही आपले पाऊल पुढे टाकून आपले हित साधण्याची इच्छा करीत होता. आणून त्याची नाभ तळून खात असे. हत्तीचे शेपूट धरून त्याचे पुढे चालणे बंद करीत असे. तो मोठा विषयी होता. आणि आपली विषयसुख घेण्याची शक्ति वृद्धिंगत व्हावी म्हणून हमेषा वाजीकरणाचा उपयोग करीत असे. (पृष्ठ८८)" ह्यावरून मुसलमानी व मराठी ग्रंथांत सुजाउद्दौल्याच्या शरीरसामर्थ्याचे सारखेंच वर्णन आहे असे दिसून येते.