पान:अयोध्येचे नबाब.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ अयोध्येचे नबाब. [भाग वीत असे. तो अत्यंत चपल, विषयासक्त व महत्त्वाकांक्षी असे.. त्याचे नेत्र विशेष पाणीदार होते. त्यावरून सकृद्दर्शनी, त्याची बुद्धिमत्ता अलौकिक असावी असे वाटे, परंतु वस्तुतः तितकी ती कुशाग्र नसे. तो राजकारणापेक्षा स्वारीशिकारीच्या कामासच अधिक योग्य होता असे म्हटले तरी चालेल. पुष्कळ दिवसपर्यंत त्याचे राज्यकारभाराकडे मुळीच लक्ष्य नव्हते. तो सूर्योदयापूर्वी उठे, घोड्यावर स्वार होई, आणि एखाद्या अरण्यामध्ये जाऊन एखाद्या वाघाची अथवा काळविटाची शिकार करून दुपारी घरी येत असे. नंतर नदीप्रवाहामध्ये जाऊन यथेच्छ जलक्रीडा करीत असे, व सायंकाळी रंगमहालांतील लावण्यवती अभिसारिकांबरोबर मन्मथलीला करीत असे."* बालपणापासून त्याचे विशेष लाड झाल्यामुळे त्यास सुखो -*सुजाउद्दौल्याच्या लोकोत्तर सामर्थ्याची कीर्ति मराठ्यांसही विश्रुत असावी असे दिसते. “भाऊसाहेबांच्या बखरी” मध्ये नारो शंकरानी सुजाउदौल्याच्या सामर्थ्याबद्दल जनकोजी शिंद्याजवळ पुढील उद्गार काढिल्याचा उल्लेख सापडतो. "तो (सुजाउद्दौला) केवळ मनुष्य नव्हे. प्रत्यक्ष अंगींही दैत्य आणि कुळीही दैत्य. बळेही भारी. हत्तीचे मागील पायावरी पाय देऊन शेपूट ओढून धरिलें तरी हत्ती जाऊ न पावे. तसेंच भागीरथीसारखी नदी, मोठे विस्तीर्ण पात्र, तें सुजाउद्दवला याने सहज आडसांगडीने रिकामें या- जावें. बुडी देऊन सुसर ओढून काढावी. उमर तो पहिली पंचविशी, परंतु शक्ति एवढी. (पृष्ठ० ५४)." सुजाउद्दौल्याच्या सामर्थ्याबद्दलची प्रसिद्धि बखर लिहिण्याच्या वेळीच होती असेंच नसून ती अलीकडेही आहे. श्रीमंत रघुनाथराव अण्णासाहेब विंचूरकर ह्यांच्या “तीर्थयात्राप्रबंध" नामक पुस्तकांत पुढील उल्लेख सांपडतोः- "लखनौ येथील नबाबाचे पूर्वज पूर्वी दिल्ली येथील बादशहाचे वजीर असता त्याचे वंशांत सुजाउद्दौला म्हणून एक पुरुष जन्मला. त्याची शरीरशक्ति फारच विलक्षण होती. त्याविषयी लोकांत अशी दंतकथा आहे की, तो शरयू नदीत की कधी पोहण्यास जात असे, आणि हरएक प्रसंगी त्या नदीतुन एक मगर धरून