पान:अयोध्येचे नबाब.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ था. ] सुजाउद्दौला. सुजाउद्दौला ह्याचे मूळचे नांव जलालुद्दीन हैदर असें होतें. तो सफदरजंग मृत्यु पावल्यानंतर इ० स० १७५४ आक्टोबर महिन्यांत अयोध्येच्या गादीवर बसला; व त्याने आपणास सुजाउद्दौला हे नांव धारण केले. त्याजवर मनसरअल्लीचे अत्यंत प्रेम असल्यामुळे तो सदैव त्याच्या स्वारीबरोबर असे. त्यामुळे त्यास बालपणापासूनच अनेक राजकारस्थानांची ओळख होऊन राजकीय शिक्षण प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे त्यास युद्धकलेचीही माहिती चांगली झाली होती. घोड्यावर उत्तम प्रकारे बसणे, तलवार, भाला वगैरेचे हात टाकणे, बंदुकीचे निशाण मारणे वगैरे गोष्टी त्यास लहानपणापासूनच अवगत होत्या. त्याची अंगकांति अत्यंत तेजःपुंज असून त्याचे शरीरसामर्थ्य लोकोत्तर होते. मुसलमानी इतिहासकार डो ह्याने त्याचें असें वर्णन केले आहे की, " तो अत्यंत सुस्वरूपवान असून फार भव्य व देखणा पुरुष होता. त्याची उंची पांच फूट अकरा इंच होती. त्याची शक्ति फार विलक्षण असे. तो तलवारीच्या एका वारासरशी एका मोठ्या बलाढ्य रेड्याचे डोके उड सुजाउद्दौल्याशी राजकारण करण्याचे प्रसंगी सांगितली म्हणून त्याच बखरींत लिहिले आहे. ही हकीकत सांगितल्यानंतर नारो शंकरास कोणी असा प्रश्न विचारिला की, “मनसूरअल्ली ह्याचा म्लेंच्छयोनीत जन्म, अमंगल तप, तेव्हां त्याचे फळ त्यास चांगलें कसें प्राप्त झाले ?” तेव्हां त्यानीं उत्तर दिले की, "भक्तपणा काही पहावयास लागत नाही. दैत्यकुळी भक्त प्रल्हाद झाला की नाही? किंवा राक्षसकुळी विभीषण झाला की नाही ? तसें, अविंधाशी मतलब नाही. तो केवळ नेकजाद प्राप्तपुरुष होता. असें दुवाचें फळ या योगेंकरून बल उत्कर्ष प्राप्त जाहलें.” ह्या आख्यायिकेवरून सुजाउद्दौला हा सत्पुरुषाच्या आशीर्वादाचा व ईश्वरीकृपेचा पुत्र होता असा मराठ्यांचा समज असावा असे दिसते.-भाऊसाहेबांची बखर, पृष्ठ ५५.