पान:अयोध्येचे नबाब.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रा.] मनसूरअल्ली सफदरजंग. सिंहासनावर बसविले. अहमदशहा बादशहास गाझीउद्दीनाची ही कृतघ्नता पाहून परम दुःख झाले व त्याने सफदरजंगास पुनः मदतीस बोलाविले. परंतु त्यापूर्वीच तो हे नश्वर जग सोडून गेला होता, त्यामुळे बिचाया बादशहास कोणीच त्राता न सांपडून तो दुःखार्णवांत पडला. गाझीउद्दीनाची ही नीच व अधम कृति पाहून वाचकांस उपकारोऽपि नीचानामपकारोऽपि जायते । पयःपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम् ॥ १ ॥ ह्या सुभाषिताचे स्मरण झाल्यावांचून राहणार नाही.