पान:अयोध्येचे नबाब.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ था. मुजाउद्दौला. (इ. स. १७५४-इ० स० १७७५.) सुजाउद्दौला ह्याचा जन्म इ० स० १७३१ मध्ये झाला. ह्याच्या जन्माची एक चमत्कारिक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ती येणेप्रमाणे:"मनसूरअल्ली. सफदरजंग ह्यास पुत्रसंतान नव्हते. त्याच्या पदरी अयोध्येसारखे मोठे राज्य, केवळ दुसरी पादशाहत, असे असून त्यास औरस संतति नाही; त्यामुळे तो नेहमी उदासीन व चिंतातुर असे. केव्हां केव्हां त्यास पुत्रावांचून राज्यसुख घेण्यापेक्षां फकिरी बरी असे वाटत असे. म्हणून पुत्रप्राप्तीस्तव तो नेहमी अतिथि-अभ्यागत, फकीरफुकरा वगैरे गरीब लोकांस द्रव्यदान, वस्त्रदान, व अन्नदान करीत असे. त्याचप्रमाणे अयोध्येत ब्राह्मण व बैरागी यांचेकडून नेहमीं अनुष्ठानें करवीत असे. शेवटी दैवयोगाने त्याच्या सत्कर्माचे सार्थक होऊन मुसलमानांची पवित्र भूमि जी मक्का तेथून एक अवलिया फकीर अयोध्येस आला. त्याने मनसूरअल्लीच्या स्वप्नांत येऊन त्यास एक फळ दिले आणि असा आशीर्वाद दिला की, “पुत्राकरितां तूं अत्यंत श्रमी आहेस; तरी हे फळ आपल्या स्त्रीस भक्षावयास दे म्हणजे तुला पुत्रप्राप्ति होईल." ह्याप्रमाणे सांगून तो सत्पुरुष अंतर्धान पावला. नंतर मनसूरअल्लीने आपल्या पत्नीस तें प्रासादिक फळ भक्षावयास दिले. पुढे काही दिवसांनी तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. तोच सुप्रसिद्ध मुजाउद्दौला हा होय."*

  • ही सुजाउद्दौल्याच्या जन्माची हकीकत “ भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये" प्रसिद्ध झाली असून ती नारो शंकर राजेबहाद्दर ह्यानी जनकोजी शिंदे ह्यास