पान:अयोध्येचे नबाब.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब.. [भाग mmmmmmmmmmmmer हे पद प्राप्त करून घेतले. नंतर त्याने आपले कपटजाल अधिक पसरून त्यांत बादशहासही गुंतविले. बादशहा आपल्या पूर्ण ताब्यांत आला असें पाहून, त्याने वजीर सफदरजंग ह्यास पदच्युत करण्याकरितां नानाप्रकारचे यत्न चालविले. ह्यांत त्यास बादशहाच्या मर्जीतला जावदखान नामक एक जनानखान्यांतील खोजा अनुकूल झाला होता. हे पाहून सफदरजंग ह्याने त्या खोजाचा चांगला समाचार घेतला. त्यामुळे बादशहाची मर्जी सफदरजंगावर फार रुष्ट झाली. ती संधि साधून गाझीउद्दीन ह्याने बादशहाकडून सफदरजंगाचे वजीर हे पद काढून घेवविले. तेव्हां सफरदजंग उदास होऊन दिल्लीदरबार सोडून लखनौस चालता झाला. तो पुनः दिल्लीस आला नाही. लखनौस गेल्यानंतर त्याने तेथील राज्यकारभारांत आपले मन घातले, व प्रजेस सुख देण्याकरितां कित्येक सार्वजनिक कामें हाती घेतली. लखनौ येथे गोमती नदीवर प्रचंड पूल बांधण्यास त्याने सुरवात केली. परंतु तें काम सिद्धीस जाण्यापूर्वीच तो ता० १७ आक्टोबर इ० स० १७५४ रोजी मृत्यु पावला. ह्याचे कबरस्थान दिल्ली येथे असून त्यावर सुजाउद्दौल्याने फार प्रेक्षणीय इमारत बांधलेली आहे. ती 'सफदरजंग' ह्याच नांवाने अद्यापि प्रसिद्ध आहे. सफदरजंग दिल्लीदरबारांतून निघून गेल्यानंतर मीर शहाबुद्दीन ऊर्फ गाझीउद्दीन ह्याने शिंदे होळकरास पुनः आपल्या मदतीस बोलाविले; आणि त्यांच्याकडून सफदरजंगाचा मित्र सुरजमल्ल जाट ह्यावर स्वारी करविली. जाट व मराठे ह्यांचा झालेला रणघोर संग्राम व कुंभेरीचा वेढा इतिहासप्रसिद्धच आहे. मराठ्यांचा जोर मिळतांच मीर शहाबुद्दीन ह्याने बादशहा अहमदशहा ह्यास नेत्रहीन करून राज्यच्युत केले ; आणि सर्व सत्ता आपल्या हाती बळकावून जहांदरशहाच्या नातवास, दुसरा अलमगीर हे नांव देऊन, दिल्लीच्या